Terrorist Attack : राजौरीत दहशतवाद्यांचा सैन्य तळावर हल्ला; अकोला जिल्ह्यातील जवान प्रवीण जंजाळ यांना हौतात्म्य

Terrorist Attack : जम्मू-काश्मिरात शनिवारी दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. तर दोन जवानांनी हौतात्म्य पत्करले.

157
Terrorist Attack : राजौरीत दहशतवाद्यांचा सैन्य तळावर हल्ला; अकोला जिल्ह्यातील जवान प्रवीण जंजाळ यांना हौतात्म्य
Terrorist Attack : राजौरीत दहशतवाद्यांचा सैन्य तळावर हल्ला; अकोला जिल्ह्यातील जवान प्रवीण जंजाळ यांना हौतात्म्य

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी राजौरी (Rajouri) येथील लष्कराच्या तळावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यावर लष्कराच्या जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले. दहशतवादी जंगलात पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे.

(हेही वाचा – Cm Eknath Shinde: सरकारच्या योजना घराघरात पोहोचवा, महायुतीचा विजय निश्चित: मुख्यमंत्री शिंदे)

4 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मिरात शनिवारी दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. तर दोन जवानांनी हौतात्म्य पत्करले. चकमकीनंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने घटनास्थळी 4 दहशतवाद्यांचे मृतदेह पडल्याचे आढळून आले. मात्र, गोळीबार सुरूच असल्याने मृतदेह बाहेर काढता आले नव्हते. या गोळीबारानंतर जिहादी दहशतवादी तेथून लगेच पळून गेले होते. लष्कर आणि पोलीस संयुक्तपणे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने दहशतवाद्यांचा पूर्ण ताकदीनिशी खात्मा करण्याचे आदेश दिले होते.

24 वर्षीय जवान प्रवीण जंजाळ यांना वीरमरण

हौतात्म्य पत्करणाऱ्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील 24 वर्षीय जवान प्रवीण जंजाळ (Praveen Janjal) यांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांशी लढताना अकोला जिल्ह्याच्या प्रवीण जंजाळ या जवानाला वीरमरण आल्याची माहिती मिळत आहे. रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई ज्ञानेश्वर माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीण यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि प्रवीण यांना हौतात्म्य आल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे जंजाळ कुटुंब व मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगार कोसळला आहे.

प्रवीण यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. या सुट्टीतच त्यांचा विवाह झाला होता. ही भेट प्रवीण यांची शेवटची ठरली. प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भरती झाले होते. त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.