पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जनतेशी थेट संवाद साधला, तेव्हा मोदींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतनिर्मित आणखी एका कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन सुरु झाले आहे, अशी घोषणा केली. ही लस नाकावाटे देणारी असणार आहे, त्यामुळे ही लस कशी असेल, याविषयी आता चर्चा सुरु झाली.
काय आहे नाकावाटे घ्यावयाची लस?
ही लस नाकावाटे घ्यायची असते. ती थेट फुफ्फुसावाटे शरीरात पसरते. त्यामुळे ती लवकर परिणामकारक बनते. मागील वर्षी शास्त्रज्ञांनी कोरोनावरील लसीचे संशोधन सुरु करताना नाकावाटे घेण्याच्या लसीवरही संशोधन प्रक्रिया सुरु केली होती. त्यावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून आले. या विषयीचे संशॊधन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य संशोधक सौम्या स्वामिनाथन म्हणाले होते कि, भारतनिर्मित नाकावाटे द्यावयाच्या लसीचे संशोधन सुरु आहे. ही लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. BBV154 ही नाकावाटे द्यावयाची लस भारत बायोटेक विकसित करत आहे. या लसीची आधीपासून चाचणी सुरु झाली आहे. नाकावाटे द्यावयाची लस भारत बायोटेक विकसित करत असून तिची पहिल्या पातळीची चाचणी सुरु झाली आहे. ही लस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठीही वापरणे शक्य होणार आहे.
(हेही वाचा : आता म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार! ५ जणांना अटक! )
ही लस कशी कार्यरत होते?
कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग ज्या अवयवांच्या माध्यमातून होतो. त्या नाक आणि फुफ्फुसांमध्येच ही लस प्रतिकारशक्ती वाढवते. विषाणूला शरीरात पसरण्यापासून आणि त्याचा संसर्ग होण्यापासून रोखणार आहे. जर नाकामध्ये विषाणूला रोखणे शक्य झाल्यास तो फुफ्फुसापर्यंत पोहचणारच नाही.
Join Our WhatsApp Community