Mumbai’s Famous Food : केवळ वडा पावच नाही तर मुंबई ‘या’ पदार्थांसाठीही आहे प्रसिद्ध!

100
Mumbai's Famous Food : केवळ वडा पावच नाही तर मुंबई 'या' पदार्थांसाठीही आहे प्रसिद्ध!
Mumbai's Famous Food : केवळ वडा पावच नाही तर मुंबई 'या' पदार्थांसाठीही आहे प्रसिद्ध!

मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. लोक येथे आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. काम शोधण्यासाठी येतात. अनेकांनी आपल्या मेहनतीने येथे नाव कमावले आहे, ज्यांच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, कामासाठी तसेच वडा पावासाठी मुंबई खूप लोकप्रिय आहे. आता तुम्ही म्हणाल हो, वडा पाव व्यतिरिक्त मुंबईत खायला खास काही मिळणार नाही. तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा फक्त तुमच्या मनाचा भ्रम आहे. वडा पाव व्यतिरिक्त या शहरात इतरही अनेक अप्रतिम खाद्यपदार्थ आहेत. (Mumbai’s Famous Food)

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. येथे महाराष्ट्रीय आहाराचा प्रभाव आहे. वडा पाव हा येथील रस्त्यावरील अतिशय प्रसिद्ध आहार आहे. पाणीपुरी, भेलपुरी, सेवपुरी, दहिपुरी, सण्ड्विचेस, रगडा-पॅट्टीस, पावभाजी, चायनिज भेल, इडली, ढोसा, या शाकाहारी पदार्थांचा ही यात समावेश आहे. जर का कुणाला मांसाहारी पदार्थ हवा असेल तर त्यांचासाठी ओम्लेट पाव, कबाब, फिश, सुद्धा मिळते. या विविध प्रकारच्या आहाराने या शहरात समाजात विविधतेतून एकता आणलेली आहे ही विशेषतः आहे. (Mumbai’s Famous Food)

सन १९८० मध्ये याच मुंबईच्या रस्त्यावर चायनीज पदार्थ खाण्याकडे मने झुकलेली होती. यात पदार्थात आणखी एक पदार्थ म्हणजे मिसळ पाव! मिसळ म्हणजे कडधान्य वापरून पातळ आमटी (करी) केलेली असते. ती तिखट आणि तेलकट पण स्वादिष्ट चमचमीत असते व ही पाव आणि भारतीय ब्रेड बरोबर खातात. खावयास देताना त्या आमटीवर कच्ची कोथिंबीर, व बारीक चिरलेला कांदा टाकतात त्यांनी त्या आमटीला वेगळा सुगंध येतो. (Mumbai’s Famous Food)

मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव (Vad Pav). मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. अगदी मुंबईत राहणारा व्यक्ती असो किंवा मुंबईमध्ये फक्त काही वेळ घालवणारा परदेशी व्यक्ती, पण तुम्हाला वडापावबाबत नक्की माहिती असते. तुम्ही कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण तुम्ही कधीही वडापाव खाऊ शकता. वडापाव हा जणू मुंबईकरांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे. (Mumbai’s Famous Food)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.