Ayodhya: राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणार ध्वजस्तंभ, वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार; अभियंत्यांनी सांगितले…

आधुनिक उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने रामकथा सादर होणार.

119
Ayodhya: राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणार ध्वजस्तंभ, वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार; अभियंत्यांनी सांगितले...
Ayodhya: राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणार ध्वजस्तंभ, वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार; अभियंत्यांनी सांगितले...

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालयाची पाहणी केली. संग्रहालयाच्या छतावरून तळमजल्यावर पाणी पडू नये यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या बांधकाम विभागाने केलेल्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली.

आधुनिक उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने रामकथा सादर होणार…

मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, बांधकाम विभाग संग्रहालयातील सर्व ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे याविषयी माहिती दिली. या संग्रहालयात पुरातत्त्वशास्त्रीय महत्त्वाच्या पुरातन वस्तूंचे सुरक्षितपणे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालयात आधुनिक उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने रामकथा सादर करणे शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकानुसार, हे संग्रहालय नव्याने विकसित करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Mahaprabhu Jagannath Rath Yatra : महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा!)

राम मंदिर विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या अजेंड्याची माहिती दिली. ते म्हणाले की, मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावरील ध्वजस्तंभासंदर्भात तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात शिखरावरील 40 फूट उंच ध्वजस्तंभ माकडे आणि वादळापासून कसा संरक्षित केला जाईल तसेच त्याचे विजेपासून कसे संरक्षण होईल, याविषयीही काळजी घेण्यात येणार आहे.

यावर मंदिर बांधणी कंपनीच्या अभियंत्यांनी सांगितले की, राम मंदिराच्या शिखरावर उभारला जाणारा ध्वजस्तंभ वादळ आणि पाण्यापासून 200 वर्षे सुरक्षित राहणार आहे. मेघगर्जनेचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.