Captain Anshuman Singh यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या…

258
Captain Anshuman Singh यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या...
Captain Anshuman Singh यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र प्रदान (Marnottar Kirti Chakra Award) केले. जुलै २०२३ मध्ये सियाचिन येथे आगीची घटना घडून अनेक लोक फसले होते. त्याठिकाणी बचाव कार्य करत असताना अंशुमन सिंह यांना वीरमरण आले. शुक्रवारी अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह, आई मंजू सिंह यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या क्रमाकांचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार स्वीकारला. यावेळी वीरपत्नी स्मृती सिंह यांनी कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या भावनिक आठवणीना उजाळा दिला. दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीचा त्यांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (Captain Anshuman Singh)

(हेही वाचा – Mumbai’s Famous Food : केवळ वडा पावच नाही तर मुंबई ‘या’ पदार्थांसाठीही आहे प्रसिद्ध!)

काय म्हणाल्या वीरपत्नी? 

दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीमध्ये वीरपत्नी स्मृती सिंह (Veerpatni Smriti Singh) म्हणाल्या की, आम्ही महाविद्यालयात एकमेकांना भेटलो. पहिल्या दिवशीच मी त्यांच्या एकतर्फी प्रेमात पडले. महिन्याभरानंतर अंशुमन यांची निवड आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजसाठी (Armed Forces Medical College) झाली. आम्ही इंजिनिअरींग कॉलेजमध्ये भेटलो होतो, मात्र नंतर ते वैद्यकीय महाविद्यालयात गेले. ते अतिशय हुशार होते. आठ वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो, त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.    (Captain Anshuman Singh) 

(हेही वाचा – व्‍हॉट्‍सअ‍ॅपवरील ‘मेटा एआय’ कडून हिंदूंच्या देवतांचा सर्रास अपमान; माफी मागण्याची हिंदूंची मागणी)

अंशुमन सिंह (Captain Anshuman Singh) यांच्याशी झालेला अखरेचा संवादही स्मृती सिंह यांनी सांगितला. “दुर्दैवाने आमच्या लग्नाच्या दोनच महिन्यानंतर त्यांची रवानगी सियाचिन येथे करण्यात आली. १८ जुलै रोजी आम्ही खूप वेळ फोनवर बोललो होतो. आमचे भविष्य कसे असेल, पुढची ५० वर्ष कशी असतील, घर कसं बांधायचं, मुलांना जन्म द्यायचा का, अशा विविध विषयांवर आम्ही गप्पा मारल्या. पण १९ जुलैच्या सकाळी मला फोन आला की, अंशुमन सिंह आता जगात नाहीत. वीरपत्नी किर्ती चक्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले असताना त्यांनी दूरदर्शनशी संवाद साधला होता. वीरपत्नी स्मृती सिंह यांनी दूरदर्शनला दिलेल्या या मुलाखतीमध्ये ही माहिती समोर आली आहे.  (Captain Anshuman Singh)

कॅप्टन अंशुमन सिंह यांचा जुलै २०२३ मध्ये हुतात्मा झाले. सियाचिन येथे भारतीय लष्कराचा दारूगोळा आणि औषधांचा साठा असलेल्या ठिकाणी आग लागली होती. या आगीतून आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवत असताना अंशुमन सिंह यांचा मृत्यू झाला.  (Captain Anshuman Singh)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.