डोंबिवली MIDCमध्ये पुन्हा स्फोट, परिसरात धुराचे लोट; नेमकं काय घडलं?

घटनेची माहिती मिळाल्यावर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

147
डोंबिवली MIDCमध्ये पुन्हा स्फोट, परिसरात धुराचे लोट; नेमकं काय घडलं?
डोंबिवली MIDCमध्ये पुन्हा स्फोट, परिसरात धुराचे लोट; नेमकं काय घडलं?

डोंबिवलीमध्ये रविवारी, (७ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण स्फोट झाल्याचा प्रकार घडला. एमआयडीसी (MIDC) परिसरात स्फोट ( Explosion) झाल्याने डोंबिवली पुन्हा हादरली. फेज-२मधील एका कंपनीत हा स्फोट झाल्याने मोठी आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळाल्यावर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच घटनास्थळी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. डोंबिवलीतील सोनार पाडा एमआयडीसीमध्ये (MIDC)हा प्रकार घडला.

(हेही वाचा –व्‍हॉट्‍सअ‍ॅपवरील ‘Meta AI’ कडून हिंदूंच्या देवतांचा सर्रास अपमान; माफी मागण्याची हिंदूंची मागणी )

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या (Dombivali) एमआयडीसी फेज-२मधील न्यू अग्रो केमिकल या कंपनीत स्फोट झाला आणि आग लागली. या कंपनीत कापडावर प्रिटींग करण्यासाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते. २ स्फोट झाल्यानंतर आग लागली आणि धुराचे लोट पाहून परिसरात नागरिकांनी याबाबत संबंधितांना माहिती दिली. इलेक्ट्रिक पार्किंगमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी काही कामगार होते. परंतु ते सर्व जण तेथून सुखरुप बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही दिवसांपूर्वीचे प्रकरण…
काही दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. असे असूनही या घटनांना आळा घालणे प्रशासनाला अद्याप शक्य झालेले नसल्याचे चित्र या घटनेवरून दिसून येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.