मागील काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी (०७ जुलै) रोजी संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली असून, १३ जुलै रोजी चलो विशाळगड असा नारा दिला आहे. तसेच आता शांत बसून चालणार नाही. भूमिका घेतलीच पाहिजे असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. तसेच किल्ले विशाळगडवर (Vishalgarh Fort) झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. १३ जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही, अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. (Sambhaji Raje)
आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातलं बघायचं आहे
दरम्यान, अन्यायाविरोधात उभे राहणे हीच माझी भूमिका असल्याचे संभाजी राजे म्हणाले. अतिक्रमण (Vishalgad encroachment) काढून टाकावे हीच एकच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजसदरेवरून संभाजी राजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तोच आमच्या मनातील आहे सांगितले होते. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं असल्याचे संभाजी राजे म्हणाले. त्यामुळे 13 जुलै रोजी दुपारी बारा वाजता चलो विशाळगडचा नारा दिल्याचे ते म्हणाले. (Sambhaji Raje)
(हेही वाचा – First Woman President of India: भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती यांच्याबद्दल जाणून घ्या)
संभाजी राजे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. आज ती वेळ आली आहे. विशाळगडला खूप मोठा इतिहास असून त्यामुळे विशाळगडला मी जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे एकूण येतो. दीड वर्षांपूर्वी गडावर गेल्यानंतर सगळी दृश्य पाहिल्यानंतर मला खूप दुःख झाल्याचे संभाजीराजे म्हणाले. (Sambhaji Raje)
(हेही वाचा – कुटुंबांसह फिरण्यासाठी Lonavala Khandala या निसर्गरम्य ठिकाणी अवश्य भेट द्या!)
शिवभक्त राजे तुम्ही भूमिका का घेत नाही अशी प्रश्न विचारू लागले होते. त्यामुळे पुन्हा चळवळ सुरू होत आहे. दोन्ही बाजूने झालेल्या आक्रमण काढावे हीच माझी मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. दीड वर्षांपूर्वी स्थगिती झाल्यानंतर सरकारने काय केले याचे उत्तर द्यावच लागेल, आता गप्प बसून चालणार नाही. भूमिका घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. (Sambhaji Raje)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community