Legislative Council: शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सोमवारी शपथविधी

173

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Legislative Council) शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी सोहळा सोमवारी, ८ जुलै रोजी विधान परिषदेत होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधान परिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधान परिषदेच्या कोकण विभाग आणि मुंबई पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीसाठीची मतमोजणी १ जुलै, २०२४ रोजी पार पडली.

(हेही वाचा – विशाळगड अतिक्रमणावरून Sambhaji Raje आक्रमक: १३ जुलैला शिवभक्तांसह गडावर जाणार )

या निवडणुकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर, मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे विजयी झाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.