PUNE: पाणीकपातीचे संकट टळले, खडकवासला धरण प्रकल्पात ६ दिवसांत किती पाणी वाढले? वाचा सविस्तर…

347
PUNE: पाणीकपातीचे संकट टळले, खडकवासला धरण प्रकल्पात ६ दिवसांत किती पाणी वाढले? वाचा सविस्तर...

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ६.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या ६ दिवसांमध्ये २ टीएमसी पाणी वाढले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता. मात्र त्यानंतर खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. २ जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात ४.५५ टीएमसी पाणी साठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे.

(हेही वाचा – IND v ZIM : झिम्बाब्वेचा डाव 134 धावांवर आटोपला; भारताने दुसरा सामना जिंकल्याने मालिका 1-1 ने बरोबरीत )

गेल्यावर्षी पेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला
नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येत असल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. गेल्या ६ दिवसांत खडकवासला धरण प्रकल्पाचा पाणीसाठा ६.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पात २२.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ७ जुलैरोजी या प्रकल्पात ६.४० टीएमसी पाणीसाठा होता. यंदा प्रथमच गेल्यावर्षी पेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. यामुळे पाणीकपातीचे संकट तुर्तास टळले असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.