मुंबई आणि उपनगरात ७ जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain In Mumbai) सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचले आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकांत पाणी साचल्याने पहाटेपासूनच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Mumbai Rains)
(हेही वाचा – Lok Sabha : हिंदू रामाचे वंशज आहेत की कुंभकर्णाचे?)
काय आहे लोकलची स्थिती ?
कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. कल्याणपासून मुंबईकडे (central railway) जाणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाला. ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक देखील सध्या ठप्प झाली आहे. (mumbai local suspended) त्यामुळे डोंबिवली, ठाणे स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे नोकरदारवर्गाने घराबाहेर पडण्याआधी या सर्व परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पश्विम रेल्वेवर सध्या काहीही परिणामा झालेला नाही.
ALERT–Due to Heavy Rain In Mumbai Suburban & Harbour Line Train Traffic Delay Due To Watter Logging.
Effected Station- CSMT- CHF-LTT.— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 7, 2024
लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन देखील रद्द करण्यात आली आहे.
Cancellation of Trains Since Water Logging in BB Div Various Station.@Central_Railway @YatriRailways pic.twitter.com/nwzfu24lN9
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 8, 2024
पावसाचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत शाळांना सुट्टी
शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास शाळांना सुट्टी देण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. (Mumbai Rains)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community