बाबू गेनू मार्केटमधील इमारत कोसळल्याच्या प्रकरणी पालिका प्लॅनिंग आणि डिझाईन विभागाशी संलग्न असलेला सहायक अभियंता मधुकर रेडेकर यांला सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) दोषमुक्त केले आहे. २०१३ मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३१ जण गंभीर जखमी झाले होते. (babu genu market building collapse)
(हेही वाचा – Maharashtra Rain : कोकणात ढगफुटी! रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!)
काय आहे प्रकरण ?
डॉकयार्ड रोड येथे ग्राऊंड प्लस चार मजले असलेली इमारत २७ सप्टेंबर २०१३ रोजी कोसळली होती. त्या इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या अशोक कुमार मेहता या भाडेकरूने मंडप सजावटीची साधने, साहित्य साठवून ठेवण्यासाठी अनधिकृत फेरफार करून खांब, बीम आणि स्तंभांचे नुकसान केले होते. परिणामी इमारत कोसळली. कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी चव्हाण यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता, परंतु खटला चालवण्याची परवानगी नसल्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
बाबू गेनू मार्केटमधील दुर्घटना घडली त्या वेळी रेडेकर हे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात रेडेकर यांच्यावर खटला चालवण्यास पोलिसांना परवानगी मिळाली नव्हती. कारण त्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने रेडेकर यांनाही या खटल्यातून दोषमुक्त करण्यात आले आहे. (Mumbai Sessions Court)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community