Mumbai Rain : पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीची गरज…

174
Mumbai Rain : पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीची गरज...
Mumbai Rain : पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्र्यांनाच मदतीची गरज...
मुंबई प्रतिनिधी 
उशिरा रात्रीपासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे तसेच पालघर मध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. (Mumbai Rain) त्यातच राज्याचे अधिवेशन सुरू असल्याने सोमवारी लवकरच अधिवेशनाला पोहोचण्याची आमदारांना घाई होती.महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनाही या पावसाचा फटका बसला असल्याचे पहायला  मिळत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने अनेक आमदार हे एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. तर मंत्री अनिल पाटील (Anil Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रेल्वे ट्रॅकवरून प्रवास केला आहे. त्याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील अनेक आमदार हे ट्रेनमध्ये अडकले आहेत. (Mumbai Rain)
विधानसभेचे अधिवेशन सुरू असून हा अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. त्यातच पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगले झोडपून काढल्यामुळे जागोजागी पाणी साठल्याने याचा परिणाम रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच विमान सेवेवर देखील झाला आहे. त्यामुळे विधिमंडळाचे कामकाज देखील आज उशिराने सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai Rain)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.