मुंबई-ठाण्यासह कोकणात (Konkan landslide) मुसळधार पाऊस सुरु आहे. लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवरही पाणी साचलं असून नागरिकांचा खोळंबा झाला. दरम्यान कुडाळ येथून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. आंबेरी पुलाला (Amber Bridge) भलेमोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे.
27 गावांचा मार्ग बंद
माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा मार्ग बंद झाला आहे. काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसल्याचे पाहायला मिळाले. कुडाळ येथील माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड पडले. त्यानंतर आता हा मार्ग आता पूर्णतः बंद झाला आहे. (Konkan landslide)
नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नव्याने बांधण्यात आलेला पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होतेय. (Konkan landslide)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community