Raigad Rain : रायगडावर ढगफुटी! मुसळधार पावसामुळे पर्यटक गडावर अडकले, पाहा व्हिडीओ

503
Raigad Rain : रायगडावर ढगफुटी! मुसळधार पावसामुळे पर्यटक गडावर अडकले, पाहा व्हिडीओ
Raigad Rain : रायगडावर ढगफुटी! मुसळधार पावसामुळे पर्यटक गडावर अडकले, पाहा व्हिडीओ

मागील 48 तासांपासून कोकण आणि लगतच्या भागांमध्ये मुसळधार पावसानं (Raigad Rain) हजेरी लावली आहे. ज्यामुळे अनेक गावांना लागून असणाऱ्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. किल्ले रायगड (Raigad Rain Video) परिसरात रविवारी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आणि क्षणात चित्र बदललं. गड परिसरात झालेल्या पावसामुळं किल्ल्यावरून विविध दिशांनी पाण्याचे लोट पायरी मार्गावरून वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पायरी मार्गावरून उतरताना पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. (Raigad Rain)

(हेही वाचा –Mumbai Rain Alert: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा आदेश, दुसऱ्या सत्रातही शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार!)

पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, सोबत मातीची लाट त्यानं वाहून आणली होती. दरम्यान, पाऊस आणि पाण्याच्या या लोटामुळे धडकी भरलेली असताना किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभं राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून वहात जाण्यापासून स्वतःला वाचवलं. (Raigad Rain)

(हेही वाचा –Konkan landslide: आंबेरी पुलाला भलेमोठे भगदाड; 27 गावांना जोडणारा मार्ग बंद)

सुट्टीचा दिवस असल्यामुळे रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती. हे पर्यटक परतीच्या मार्गावर असतानाच हा प्रकार घडला. दुपारी साधारण 3.30 ते 4 वाजण्याच्या सुमारास किल्ले रायगड भागात अचानक पाऊस सुरू झाला, पावसाचा जोर एकाएकी इतका वाढला की, पाण्याचे लोंढे किल्ल्यावरून खाली कोसळू लागले होते काही क्षणातच पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या संपूर्ण आव्हानात्मक स्थितीमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. या ढगफुटीसदृश्य पावसानं रायगड भागातील अनेक गावांनाही तडाखा दिल्याचं पाहायला मिळालं. (Raigad Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.