- मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे सकाळीच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली असून याचा फटका अनेकांना बसला आहे. (Monsoon Session)
या सर्व मधून लोकप्रतिनिधी देखील वाचले नाहीत. विदर्भ तसेच उत्तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागातून रेल्वे मार्गाने येणारे आमदार रेल्वेमध्येच अडकले आहेत. त्याचप्रमाणे विधिमंडळाचे कर्मचारी देखील वेळेवरती विधानभवनापर्यंत पोहोचू शकले नसल्याने आज विधिमंडळाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Monsoon Session)
पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) हा तिसरा आठवडा असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी वॉटर लॉगिन झाल्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच विमान सेवेला देखील परिणाम जाणवत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community