Abhishek Sharma : झिंबाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा 

Abhishek Sharma : झिंबाब्वेविरुद्ध अभिषेकने ४७ चेंडूंत शतक साजरं केलं 

126
Abhishek Sharma : झिंबाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा 
Abhishek Sharma : झिंबाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा 
  • ऋजुता लुकतुके 

टी-२० क्रिकेटमधील शतक हे विशेष असतं. कारण, २० षटकांत तुम्हाला ही मजल मारायची असेल तर घणाघाती फलंदाजी हा एकच उपाय असतो. २३ वर्षीय अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) टी-२० शतकवीरांच्या मांदियाळीत अलगद जाऊन बसला आहे. झिंबाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ४७ चेंडूंत त्याने घणाघाती १०० धावा केल्या. भारताला मालिकेत बरोबरीही साधून दिली. अभिषेकचं (Abhishek Sharma) शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) ७७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत २ बाद २३४ धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिंबाब्वेला १३४ धावांतच गुंडाळलं. त्यामुळे भारताचा १०० धावांनी विजय साकार झाला. (Abhishek Sharma)

भारतीय टी-२० संघ सध्या रोहित, विराट आणि रवींद्र जडेजा यांचा उत्तराधिकारी शोधत आहे. अशावेळी अभिषेकचं हे शतक दखल घ्यायला लावणारं आहे. गंमत म्हणजे २३ वर्षीय अभिषेक या सामन्यात शुभमन गिलच्या (Shubman Gill) बॅटने खेळला. (Abhishek Sharma)

(हेही वाचा- Mumbai Rain : लोकल पकडताना तिचा पाय घसरला, अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण…)

‘जेव्हा जेव्हा मी दडपणाखाली असतो, मला काहीतरी करून दाखवण्याचं दडपण असतं, मी शुभमनची बॅट घेतो,’ सामन्यानंतर अभिषेकने अगदी मिश्किलपणे सांगून टाकलं. अभिषेक आणि शुभमन पंजाब संघातील सहकारी आहेत. अभिषेकला युवराज सिंग मार्गदर्शन करतो. दोघंही डावखुरे शैलीदार फलंदाज आहेत. (Abhishek Sharma)

बारा वर्षांखालील गटापासून शुभमन आणि अभिषेक एकत्र खेळत आहेत. तेव्हापासूनच अभिषेकला ही बॅट मागून घ्यायची सवय होती, असंही त्याने सांगून टाकलं. शुभमनच्या बॅटने रविवारी अभिषेकने ८ षटकार आणि ७ चौकार ठोकले. ‘एक दिवस आधी मी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. शून्यावर बाद झालो. ते अपयश मला लवकरात लवकर पुसून टाकायचं होतं. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी चांगली फटकेबाजी करू शकतो, धावसंख्या कितीही असली तरी त्याचं दडपण मी घेत नाही. मी आक्रमक फटके खेळत राहतो. आता मला क्षमतेला न्याय द्यायचा आहे,’ असं सामन्यानंतर अभिषेकने बोलून दाखवलं. (Abhishek Sharma)

(हेही वाचा- Mumbai–Nashik Expressway ची चाळण, अडीच तासांच्या प्रवासाला लागतात आठ तास; टोल भरूनही प्रवाशांचे हाल)

भारताकडून अभिषेकने १००, ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) नाबाद ७७ तर रिंकू सिंगने (Rinku Singh) नाबाद ४७ धावा केल्या. अभिषेकला शतकी कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. गोलंदाजीत भारताकडून मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. (Abhishek Sharma)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.