- ऋजुता लुकतुके
भारतीय संघात सध्या टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही प्रकारात जोरदार चुरस आहे. नवीन खेळाडू तयार होतायत, चांगल्या देशांतर्गत कामगिरीमुळे एकमेकांना आव्हान देतायत आणि संघात प्रवेश करण्याची उमेद बाळगून आहेत. अशावेळी २५ वर्षीय इशान किशनही (Ishan Kishan) संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. इतकंच नाही तर तीनही प्रकारात पुन्हा खेळावं, अशी आस त्याला आहे. (Ishan Kishan)
(हेही वाचा- Powai Lake भरला, आता मिठी नदीही भरणार)
अर्थात, संघात स्थान मिळवायचं असेल तर त्याची स्पर्धा त्याचा सारखाच दिल्लीकर असलेल्या रिषभ पंतशी (Rishabh Pant) आहे. ‘रिषभ परतलाय हे खूपच छान झालं. शिवाय त्यामुळे संघात स्थान मिळवण्याची स्पर्धाही वाढलीय. मला स्पर्धा आवडते. स्पर्धेमुळे खेळात सुधारणा होते. तुम्हाला तुमच्या कामगिरीचं समाधानही वाटतं,’ असं इशान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. (Ishan Kishan)
इशान किशन भारतासाठी २ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने ७८ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. कसोटीच्या तुलनेत एकदिवसीय आणि टी-२० साठी त्याला जास्त संधी मिळाल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २७ सामन्यांत ४३ च्या सरासरीने ९३३ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये ३२ सामन्यांत त्याने ७३३ धावा केल्या आहेत. (Ishan Kishan)
नोव्हेंबर २०२३ पासून तो भारतीय संघात खेळलेला नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याची निवड झाली होती. पण, त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर असताना त्याने मानसिक थकव्याचं कारण देत दौरा अर्धवट सोडला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर तर आहेच, शिवाय बीसीसीआयचा रोषही त्याने ओढून घेतला आहे. बीसीसीआयने वेळोवेळी सूचना देऊनही तो झारखंड संधासाठी रणजी करंडक आणि इतर स्पर्धा खेळला नाही. त्यामुळे बीसीसीआयने यंदा त्याला करारातूनही वगळलं आहे. (Ishan Kishan)
आता मात्र इशानने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ‘मी टी-२०, एकदिवसयी, कसोटी अशा तीनही प्रकारात खेळू शकतो. मला तीनही संघात स्थान मिळवायचं आहे. भारतीय संघासाठी योगदान देत राहवं असं मला वाटतं,’ असं इशान म्हणतोय. (Ishan Kishan)
(हेही वाचा- Water logging : …तरीही मुंबईची तुंबई झाली, क्या हुआ तेरा वादा!)
आपला खेळ आणि कौशल्य यावर काम करत राहण्याचा निर्धार त्याने केला आहे. (Ishan Kishan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community