Gopal Nilkanth Dandekar : रसिक कलावंत, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमी !

160
Gopal Nilkanth Dandekar : रसिक कलावंत, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमी !

सोमवार ८ जुलै. गोनीदा म्हणजेच गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा जन्म दिन. गोपाळ नीलकंठ दांडेकर हे भारतीय मराठी साहित्याचे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांना गोनीदा म्हणूनही ओळखलं जातं. गोनीदा हे सृजनशील रसिक कलावंत, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीही होते. (Gopal Nilkanth Dandekar)

गो. नी. दांडेकर यांचा जन्म ८ जुलै १९१६ साली महाराष्ट्रातल्या परतवाडा म्हणजे विदर्भात झाला. ते वयाच्या बाराव्या वर्षी इयत्ता सातवीत असताना त्यांच्या राहत्या घरातून पळून गेले, कारण त्यांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यायचा होता. पुढे ते संत गाडगे महाराज यांच्या सहवासात आले. गाडगे महाराजांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ते गावोगावी फिरून जनजागृती करायला लागले. त्यानंतर त्यांनी वेदांतांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून काम करायला लागले. (Gopal Nilkanth Dandekar)

(हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित लोकांच्या मनातील कर्णधार,’ – सुनील गावसकर)

१९४७ साली गोनीदा यांनी लेखन करून आपला जीवितार्थ चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यात ललित गद्य, चरित्र, कादंबऱ्या, कुमारसाहित्य, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, पौराणिक आणि धार्मिक अशा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं. (Gopal Nilkanth Dandekar)

त्यांनी लिहिलेल्या ‘शितू’ आणि ‘पडघवली’ या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला कोकणच्या नयनरम्य निर्सगाचं दर्शन होतं. गोनीदा यांनी ५० वर्षं दुर्गभ्रमण केलं होतं. त्यावेळी त्यांनी त्या गडांची असंख्य छायाचित्रं काढली. त्यांपैकी ११५ निवडक छायाचित्रांचं एक पुस्तक ‘गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झालं होतं. याव्यतिरिक्त त्यांनी ‘दुर्गभ्रमणकथा’ आणि ‘दुर्गदर्शन’ नावांच्या पुस्तकामधून आपल्याला आलेल्या अनुभवांचं लिखाण शब्दबद्ध करून महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं दर्शन घडवलं आहे. १ जून १९९८ साली पुणे येथे राहत्या घरी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या सुपुत्री वीणा देव यासुद्धा प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांच्या दोन्ही नाती मृणाल देशपांडे आणि मधुरा याही अभिनेत्री आणि लेखिका आहेत. (Gopal Nilkanth Dandekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.