CM Eknath Shinde: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा; म्हणाले “नागरिकांनी सहकार्य करावे”

105
CM Eknath Shinde: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा; म्हणाले “नागरिकांनी सहकार्य करावे”
CM Eknath Shinde: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा; म्हणाले “नागरिकांनी सहकार्य करावे”

मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत (Mumbai Heavy rain) निर्माण झालेल्या पूर परस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून (Disaster Management Room) आढावा घेतला. मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, बाधित झालेली रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित लोकांच्या मनातील कर्णधार,’ – सुनील गावसकर )

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले, तसेच मुंबईत जवळपास साडे चारशेवर पंप सुरू आहेत. त्यातून पाण्याचा निचरा होत आहे. त्यामुळे हिंदमाता, मिनल सबवे येथे पाणी साचलेले नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – Powai Lake भरला, आता मिठी नदीही भरणार)

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्यासह मुंबईत पाऊस सुरु आहे. एकत्रित मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने राज्यात काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सर्व जिल्हास्तरावरील टीम एकत्रित काम करत आहेत. या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा प्रभावित झालेली आहे. लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एसटीसह बेस्टच्या (ST BUS) सेवा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याकरिता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.