मुंबईसह उपनगरात रविवारी, (७ जुलै) पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचलं, रेल्वे रुळांवर पाणी साचलं. यामुळे सोमवारी, (८ जुलै) पहाटेपासूनच लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य आणि हार्बर मार्गावर लोक वाहतूक ठप्पा पडली. त्यामुळे आता पुढचे ३ तास मुंबईसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून मुंबई, रत्नागिरी, रायगड परिसरात पुढील ३ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि सातारा, कोल्हापूर आणि नाशकातील घाट माथ्यावर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला असून गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यलो अलर्ट जाहीर
राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असून १० जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आह. पुढील ५ दिवस मुंबईसह उपनगर आणि कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या ५ दिवसांत कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
पुणे, कोल्हापूर, साताऱ्यालाही धुव्वाधार पावसाचा इशारा
विदर्भातील बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यालाही धुव्वाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community