मागील लोकसभेत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महिला खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नवीन कायद्याने त्यांच्या खासदार पदाला धोका आहे. नवीन लोकसभेला सुरुवात होऊन एक महिना देखील झाला नसेल तर मोईत्रा यांनी नवीन वाद ओढवून घेतला आहे. (Mahua Moitra)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता या नवीन फौजदारी कायद्यातील कलम ७९ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. (Mahua Moitra)
कोणत्याही न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींना दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा दिल्यास त्यांची खासदारकी किंवा आमदारकी लगेच रद्द केली जाते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई होते. महुआ मोईत्रा यांना या प्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. (Mahua Moitra)
मागील वर्षी लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे या प्रकरणात त्या महुआ दोषी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. भाजपाचे खासदार निशीकांत दुबे यांनी याबाबत तक्रार केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महुआ पुन्हा निवडून आल्या आहेत. (Mahua Moitra)
(हेही वाचा – Kashmir मध्ये चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घराच्या कपाटामागे खोदला बंकर)
कशी होऊ शकते शिक्षा?
शर्मा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही तातडीने नवीन कायद्यातील कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमाअंतर्गत दोषी व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत शिक्षा वाढवली जाऊ शकते. तसेच दंडात्मक शिक्षेची तरतुदही या कलमांतर्गत आहे. (Mahua Moitra)
काय आहे वाद?
महुआ यांनी एक्सवर शर्मा यांच्याविषयी एक पोस्ट केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. पण शर्मा यांनी महुआ यांची टिप्पणी गंभीरपणे घेत थेट पोलिसांत तक्रार करत तीन दिवसांत अहवालही मागवला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने महुआ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे देण्यात आले आहे. महुआ मोइत्रा यांनी केलेले विधान अपमानास्पद आणि महिलांना सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Mahua Moitra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community