- ऋजुता लुकतुके
आपल्या अर्थविषयक जीवनात मार्च आणि जुलै हे दोन महत्त्वाचे महिने आहेत. मार्च महिना आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. तर जुलै महिन्यात आधीच्या वर्षाचा मिळकतीचा लेखाजोखा आयकर विभागाला सादर करण्याचा महिना आहे. म्हणजेच आयकर विवरणपत्र भरण्याचा शेवटचा महिना आहे. यंदाही आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै हीच आहे. पण, काही कारणांनी ही मुदत चुकली तर नेमकी काय सोय आहे, तुम्हाला माहीत आहे का? विलंबाने विवरणपत्र भरता येतं का, त्याचं शुल्क काय आहे, हे जाणून घेऊया. (ITR Filing)
आता जाणून घेऊया जुलै महिन्यात विवरणपत्र भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आणि इतर महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत? (ITR Filing)
आर्थिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख कोणती?
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी आर्थिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै ही आहे. (ITR Filing)
(हेही वाचा – Veer Savarkar : मार्सेलिसची उडी ही युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप – ह.भ.प. गणेश महाराज करंजकर)
ही तारीख चुकली तर काय होईल?
डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्हाला विलंबित विवरणपत्र भरता येईल.
विलंबित विवरणपत्र भरण्याचं विलंब शुल्क किती आहे?
विलंब शुल्क रुपये १,००० ते रुपये १०,००० इतकं आहे. जितका उशीर होईल तेवडं हे शुल्क वाढतं. (ITR Filing)
आर्थिक विवरणपत्र कुणी भरायचं?
तुमचं एका आर्थिक वर्षातील उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला विवरपणपत्र भरणं अनिवार्य आहे. शिवाय तुम्ही भारताचे नागरिक असाल. पण, परदेशात तुमची काही मालमत्ता असेल. किंवा परदेशातील मालमत्तेतून तुम्हाला काही मिळकत मिळत असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. भारताबाहेर एखादं आर्थिक खातं तुम्ही सांभाळत असाल तरी तुम्हाला विवरणपत्र दाखल करावं लागतं. परदेशातली एखादा म्युच्युअल फंड, शेअर, बाँड यांच्यात तुमची गुंतवणूक असेल आणि तुम्ही पगारदार किंवा कमावणाऱ्या नसाल तरीही तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. तुम्ही एका वर्षात एक लाख रुपयांपर्यंतचं वीज बिल भरलं असेल किंवा परदेश वारीवर दोन लाख रुपये खर्च केले असतील तर तुम्हाला विवरणपत्र भरावंच लागतं. तुमच्या सर्व खात्यात मिळून ५०,००,००० लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरावं लागतं. (ITR Filing)
कुठलं विवरणपत्र भरायचं?
इनकम टॅक्स रिटर्न अर्थात आर्थिक विवरणपत्राचे चार प्रकार आहेत. आयटीआर १ ते आयटीआर ४ असे चार वेगळे फॉर्म असतात.
आयटीआर १ – पगारदार, एका घरातून उत्पन्न असलेले व इतर स्त्रोत
आयटीआर २ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ, ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न नाही
आयटीआर ३ – वैयक्तिक करदाते व एचयुएफ ज्यांना उद्योगधंद्यातून प्राप्ती होते
आयटीआर ४ – अनिश्चित मिळकत असलेले व्यावसायिक व उद्योजक
विवरणपत्रासोबत लागणारे दस्तऐवज कुठले?
विवरणपत्राबरोबर कुठलंही कागदपत्र जोडावं लागत नाही. पण, पगारदार असाल तर तुमचा फॉर्म १६, पॅन व आधार कार्ड, टीडीएस कापला गेला असेल तर त्याच्या नोंदी, बँक खात्यातील नोंदी व नवीन शेअर खरेदी किंवा इतर कुठलाही व्यवहार असेल तर तशी नोंद असलेलं कागदपत्र या गोष्टी लागतात. (ITR Filing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community