मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत आता चांगल्याप्रकारे वाढ होत असून सोमवारी या सर्व धरण आणि तलावांमध्ये तब्बल १८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी दिवसभरात जमा झालेला एकूण पाणीसाठा हा २ लाख ७१ हजार १४७ दशलक्ष लिटर एवढा झाला आहे. मागील वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेल्या पाणीसाठ्याने आता पाठलाग सुरु केला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ अडीच टक्क्याचा साठा कमी आहे. (Water Supply)
(हेही वाचा – NEET Exam: ज्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला त्यांची माहिती 10 जुलैपर्यंत द्यावी, 11 जुलैला सुनावणी; Supreme Court म्हणाले…)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून मुंबईकरांना दिवसाला ३९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा आवश्यक आहे. त्यातुलनेत यंदा २ लाख ७१ हजार १४७ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा ८ जुलै २०२४ पर्यंत जमा झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत २१.५७ टक्के अर्थात ३ लाख १२ हजार २५१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. तर त्या त्या आधीच्या म्हणजे सन २०२२ मध्ये २५.९४ टक्के अर्थात ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला होता. सर्वात जास्त पाऊस विहार तलावात पडला असून दिवसभरात या तलावात ३६४ मि मी एवढा पावसाची नोंद झाली, तर तुळशी तलावात ४५ मिमी एवढा पाऊस पडला. परंतु अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या धरण आणि तलावांत अजूनही समाधान पाऊस पडलेला नाही. (Water Supply)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community