Worli hit and run case: मिहीरसह संपूर्ण शहा कुटूंब बेपत्ता, राजेश शहा याने पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

158
Worli hit and run case: मिहीरसह संपूर्ण शहा कुटूंब बेपत्ता, राजेश शहा ने पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
Worli hit and run case: मिहीरसह संपूर्ण शहा कुटूंब बेपत्ता, राजेश शहा ने पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli hit and run case) फरार असलेला मुख्य आरोपी मिहीर शहाचे (Mihir Shah) कुटूंब ‘नॉट रीचेबल’ झाले आहे. तसेच शहा कुटूंबियाच्या जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन स्विच ऑफराजेश शहा असल्यामुळे शहा कुटूंब हे मिहीर सोबत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात वरळी पोलिसांनी अटक केलेल्या मिहीरचे वडील राजेश शहा (Rajesh Shah) यांच्यावर मुलाला पळवून लावणे आणि पुरावा नष्ट केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राजेश शहा यांची भोईवाडा न्यायालयाने १५ हजाराच्या रोख जामीनावर सुटका केली असून, चालक राजऋषी बिदावत याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  (Worli hit and run case)
पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा (२२) याने त्याच्या बीएमडब्ल्यू या मोटारीने वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर असलेल्या अट्रिया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर मिहीर याने मोटार न थांबवता, दुचाकीवर असलेल्या महिलेला दोन किलोमीटर फरफटत वरळी सी फेस येथील जंक्शन येथे मोटार थांबवून मिहीर च्या शेजारी बसलेल्या राजऋषी बिदावत याने मयत कावेरी नाखवा (Kaveri Nakhwa) यांना  मोटारीच्या बोनेट वरून खाली उतरवले आणि बिदावत याने मोटारीचा ताबा स्वतःकडे घेत सी लिंक येथून वांद्रे कलानगर येथे आले. त्या ठिकाणी मोटार बंद पडल्यानंतर मिहिरने वडिल राजेश यांना फोन अपघातासबंधी सर्व माहिती दिली व तो रिक्षा करून एकटाच गोरेगाव येथे एका मैत्रिणीच्या घरी आश्रयाला गेला. (Worli hit and run case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शहा यांनी मिहीरला पळून जाण्यास सांगितले, त्यानंतर शहा हे चालक बिदावत सोबत कलानगर येथे आले, त्यांनी गाडीवरील पक्षाचे स्टिकर काढून टोइंग व्हॅन बोलावून अपघातग्रस्त मोटार लपविण्याची योजना आखली होती. परंतु, त्याच दरम्यान वरळी पोलीस मोटारीचा माग काढत कलानगर येथे दाखल झाले व त्यांनी मोटारीसह राजेश शहा आणि चालक बिदावत यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान मैत्रिणीच्या घरी गेलेल्या मिहिरला घेण्यासाठी त्याची बहीण आली होती. मिहीर रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या बहिणीसोबत निघून गेला अशी माहिती मैत्रिणीने पोलिसांना दिली.  (Worli hit and run case)
पोलिसांनी मिहीरचा शोध घेण्यासाठी आईच्या मोबाईलवर फोन कॉल केले. परंतु, त्यांचे फोन स्विच ऑफ येत होते. पोलिस पथक शहा यांच्या बोरिवली येथे घरी गेले असता घराला कुलूप होते. पोलिसांनी शहा कुटूंबीयाच्या जवळच्या नातेवाकाचे मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे मोबाईल फोन देखील बंद असल्याचे दाखवत होते. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. अटक करण्यात आलेल्या राजेश शहा आणि चालक बिदावत यांना सोमवारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने राजेश शहा याला १५ हजारच्या रोख जामिनावर सोडले असून चालक बिदावत याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Worli hit and run case)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.