Heavy Rains: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

318
Heavy Rains: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Heavy Rains: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ते व रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजून नागरिकांचे प्रचंड हाल झाले. भारतीय हवामान खात्याने ९ जुलै रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai School closed) क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळा मंगळवार, ९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवण्यात येतील, असे आदेश नवी मुंबई महानगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे (Commissioner Dr. Kailas Shinde) यांनी दिले आहेत. (Heavy Rains)

(हेही वाचा – जम्मू काश्मीरबाबत भारतविरोधी अपप्रचार करणाऱ्या Shabana Mahmood बनल्या ब्रिटनच्या नव्या ‘न्यायमंत्री’)

तसेच, ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांनाही (Thane district Schools closed) मंगळवारी (९ जुलै) सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे (District Education Officer Balasaheb Rakshe) यांनी याबाबतचे स्वतंत्र आदेश सोमवारी रात्री जारी केले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.