Election Commision : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अधिकृत मान्यता

179
Election Commision : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अधिकृत मान्यता
Election Commision : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अधिकृत मान्यता

लोकसभा निवडणुकीत राज्यात 10 पैकी 8 जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commision) मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार (Sharad Pawar) यांना हा दिलासा मानला जात आहे.

(हेही वाचा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत Election Commission of Indiaकडून आढावा)

निवडणूक आयोगाच्या (Election Commision) वतीने देण्यात आलेल्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

(हेही वाचा – Mumbai Rain : मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर)

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही निवडणूक आयोगाकडे (Election Commision) दुसरी एक विनंती केली. यामध्ये तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.