Modi Meets Putin: ”तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणं हा योगायोग नाही, तुम्ही…”; व्लादिमीर पुतिन यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक!

193
Modi Meets Putin: ''तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणं हा योगायोग नाही, तुम्ही…''; व्लादिमीर पुतिन यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक!
Modi Meets Putin: ''तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणं हा योगायोग नाही, तुम्ही…''; व्लादिमीर पुतिन यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक!

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले. तसेच त्यांची गळाभेट घेत, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केलं. पुतिन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुतिन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. पुतिन आणि मोदी यांनी गळाभेटही घेतली. व्लादिमीर पुतिन म्हणाले, सर्वप्रथम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला वाटतं की, हा विजय काही योगायोग नाही. हा निकाल तुमच्या सरकारच्या अनेक वर्षांच्या कामाची पोचपावती आहे. देशातील जनतेच्या भल्यासाठी काय करायला हवं, याची जाणीव तुम्हाला आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केलं आहे आणि भारतातील जनतेलाही याची जाणीव आहे.

(हेही वाचा – Election Commision : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अधिकृत मान्यता)

पुतिन यांच्या स्वागतानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. पुतिन यांनी ज्याप्रकारे माझं स्वागत केलं, ते बघून मी भारावून गेलो आहे. या स्वागतासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. बदल घडवणं हे माझं आयुष्याचे ध्येय आहे. देशातील जनतेने माझ्या योजनांचा स्वीकार करत मला तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दोन्ही देशातील आर्थिक व राजनीतीक संबंध मजबूत
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे रशियात पोहोचले आहेत. दरम्यान, मंगळवारी (९ जुलै) पंतप्रधान मोदी हे रशिया आणि भारत यांच्यातील २२व्या शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी दोन्ही देशातील आर्थिक व राजनीतीक संबंध मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.