वरळी हिट अँड रन (worli hit and run) प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती मुख्य गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयासमोर दिली. तसेच आरोपीच्या वडिलांकडून गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. तसेच, मिहिरने ज्या-ज्या रस्त्यांवरून पळून जाताना गाडी नेली, त्या-त्या ठिकाणचेही सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आहेत. या सीसीटीव्हीमधून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट समोर आली आहे.
(हेही वाचा – Rafale Marine Jet : नौदलासाठी 26 जेट विमाने खरेदीकरिता भारताकडून वाटाघाटी; फ्रान्ससोबत चर्चेची दुसरी फेरी)
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ?
सीसीटीव्ही फुटेज तपासताना मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर शाह यांनी कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. वरळी सीलिंक येथे मिहीरने गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं, ड्रायव्हर राजऋुषी गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्या वेळी दोघांनी गाडी बाजून घेऊन न जाता गाडी पाठीमागे घेतली आणि थेट कावेरी यांच्या अंगावर घालून तिथून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run) पोलीस (Mumbai Police) तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. सोमवारी मिहीरचे वडील शिवसेना उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर करण्यात आला. सध्या फरार मिहीरचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण ?
वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला मिहिर शाह यांच्या चारचाकी गाडीने धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकानं गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्याने बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेले. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले आहेत. कावेरी यांचा मात्र जागीच मृत्यू झाला. (Worli Hit and Run)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community