स्त्रियांना जसे दागिने प्रिय असतात, तसाच गजराही प्रिय असतो. गजरा आणि स्त्रियांचं खूप जुनं नातं आहे. आपल्या पूजनीय देवींनाही गरजा आवडतो, हे तुम्हाला माहितंच असेल. लक्ष्मीचं व्रत करताना आपण लक्ष्मीला वेणी माळतो. प्राचीन काळापासून, दक्षिण आशियातील स्त्रिया सजण्यासाठी गजरा वापरत. पूजा, कोणत्याही सण किंवा लग्नात गजरा वापरण्याची परंपरा आहे. (Sampangi Flower)
महिलांना देवीचे रुप मानले जाते. म्हणून गजर्याला अध्यात्मिक व धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. हिंदु धर्मात तर यास पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. स्त्रिचं सात्विक सौंदर्य यातून प्रकट होतं. तर आज आम्ही तुम्हाला गजरा कसा बनवायचा याबद्दल सांगणार आहोत. त्यातही संपंगी फुलांचा गजरा बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. संपंगी फुलांची माळ किंवा हारही तुम्ही बनवू शकता. (Sampangi Flower)
(हेही वाचा – Rafale Marine Jet : नौदलासाठी 26 जेट विमाने खरेदीकरिता भारताकडून वाटाघाटी; फ्रान्ससोबत चर्चेची दुसरी फेरी)
१. फुलांचा गजरा बनवण्यासाठी तुम्हाल सर्वात आधी संपंगी फुलं घ्या लागतील
२. त्याचबरोबर आणखी दोन-तीन प्रकारची फुलं घेतली तर गजरा आणखी सुंदर दिसेल.
३. आता सुई आणि धागा घ्या.
४. एक फुल धाग्यात बांधून दुसर्या बाजूला विरुद्ध दिसरे फुल ओवा. त्याचबरोबर अधूनमधून इतर फुले ओवा.
५. दोन्ही तोंडं विरुद्ध दिशेला दिसतील अशा तर्हेने फुलं ओवा.
६. गजरा फारसा मोठा बनवू नका. पण फुलांनी बहरलेला असावा याची काळजी घ्या.
७. गजरा आणखी छान दिवासा म्हणून कळी देखी बांधू शकता.
८. एक एक कळी घाला आणि संपूर्ण गजर्यात ओवा.
९. कळ्या बाहेर पडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी दोन्ही किनारे व्यवस्थित बांधून घ्या.
१०. सर्वात शेवटी गाठ घट्ट बांधून घ्या.
११. आता तुमचा संपंगी फुलांचा गजरा तयार आहे. (Sampangi Flower)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community