Mogra Flower : घरी मोगर्‍याचे रोप कसे लावाल आणि कशी घ्याल काळजी?

108
Mogra Flower : घरी मोगर्‍याचे रोप कसे लावाल आणि कशी घ्याल काळजी?

“मोगरा फुलला, मोगरा फुलला” हे गीत ऐकतानाच मोगर्‍याचा सुगंध दरवळतोय असा भास होतो. मोगर्‍याचं फुल कोणाला नाही आवडत? मग विचार करा, जर तुम्ही घराच्या टेरेसवर किंवा अंगणात मोगर्‍याचं रोप लावलं तर किती छान होईल! अनेकांना बागकामाची आवड असते, परंतु कधीकधी जर तुमची रोपे नीट बहरली नाहीत तर खूप वाईट वाटते. जर तुम्हाला देखील बागकाम आणि विविध प्रकारची फुले लावण्याची आवड असेल, तर तुम्ही खास उपयुक्त टिप्स लक्षात घेतल्या पाहिजेत. (Mogra Flower)

मोगर्‍याचे रोप कसे लावावे? :

मोगऱ्याचे रोप कधीही प्लास्टिकच्या भांड्यात लावू नये, मोगर्‍याचे रोप मातीच्या भांड्यातच चांगले फुलते. मोगरा रोप प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवल्यास सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिक गरम होऊन रोपाच्या मुळांना इजा होऊ शकते. म्हणून ही बाब नक्की लक्षात घ्या. (Mogra Flower)

मोगर्‍याला हवे पुरेसे ऊन :

बर्‍याचदा आपण मोगर्‍याचे रोप लावतो. पण पुरेशी फुलं येत नाही. म्हणून आपलं मन हिरमुसतं. मात्र यावर एक महत्त्वाचा उपाय असा की तुम्ही तुमच्या मोगरा रोपाला दररोज किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करायला हवी. कारण मोगरा रोपाला जितका प्रकाश मिळेल तितकी त्याची वाढ चांगली होते. (Mogra Flower)

हवी चांगल्या दर्जाची माती :

मोगर्‍याची फुले सच्छिद्र जमिनीत चांगली बहरतात आणि पाण्याचा चांगला निचरा होतो. जमिनीत पाण्याचा निचरा चांगला असेल, तर जमिनीतील अतिरिक्त पाणी कुंडीच्या छिद्रातून सहज बाहेर जाते, त्यामुळे मोगर्‍या रोपामध्ये जास्त पाणी साचण्याची समस्या उद्भवत नाही. मोगर्‍या रोपासाठी चांगला निचरा होणारी आणि पोषक तत्वांनी युक्त माती तयार करण्यासाठी शेणखत, गांडूळ खत, कोको पीट आणि वाळू जमिनीत मिसळावी. (Mogra Flower)

(हेही वाचा – Sampangi Flower : संपंगी फुलांचा गजरा कसा बनवाल? काही सोप्या टिप्स जाणून घेऊया!)

छाटणी करायला विसरु नका :

जर तुम्ही रोपाची छाटणी केली नाही तर त्याला फारच कमी फुले येतील आणि जास्तीत जास्त २ ते ४ फुले येतील. जर तुम्ही मार्च महिन्यापूर्वी रोपाची छाटणी केली तर चांगल्या प्रमाणात फुलं येतील. (Mogra Flower)

कीटकांपासून रोपाचे संरक्षण करा :

जर तुम्हाला तुमच्या मोगरा रोपावर पांढरे डाग दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या रोपावर कीटकांनी हल्ला केला आहे. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि हळूहळू झाडाची पानेही पिवळी पडू लागतात. म्हणून बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर करा आणि तुमच्या रोपाचे रक्षण करा. (Mogra Flower)

कोणते खत वापराल? : 

मोगर्‍याच्या रोपाला पोषक खत आवश्यक आहे. मातीमध्ये ५० टक्के शेण मिसळा. महिन्यातून एकदा माती बदला आणि त्यात १५ टक्के वाळू घाला. (Mogra Flower)

अशाप्रकारे तुम्ही मोगर्‍याच्या रोपाची काळजी घेऊ शकता आणि मग तुमच्या बागेत किंवा घरासमोर बहरतील मोगर्‍याची फुलं… ज्यांचा सुगंध घेऊन तुम्ही व्हाल प्रफुल्लित… (Mogra Flower)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.