RSS ची १२ ते १४ जुलैला रांचीत बैठक; BJP च्या कामगिरीवर करणार चर्चा

146
दिल्ली जिंकण्यासाठी RSS चे स्वयंसेवक सज्ज

महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ झारखंडची राजधानी रांचीत दोन दिवस विचारमंथन करणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पिछेहाट का झाली? आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपाने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे. हे भाजपा आणि संघाचे यश होय. परंतु, यावेळचे सरकार हे स्वबळावरचे नसून रालोआतील घटक पक्षांच्या कुबड्यावर अवलंबून आहे. (RSS)

आगामी काळात महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. अशात, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत व्हायला नको याची चिंता भाजपा आणि संघाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी न होणे ही संघासाठी मोठी चिंतेची बाब आहे. उत्तरप्रदेश या देशाच्या सर्वात मोठ्या राज्यातही भाजपाला खूप मोठा फटका बसला आहे. भाजपासाठी सर्वात सुपीक मानणाऱ्या उत्तर प्रदेशातील दलित आणि ओबीसी समाजातील भाजपाची पकड कमकुवत झाल्याबद्दल संघ परिवारालाही चिंता आहे. निवडणुकीच्या निकालांनी संघ परिवाराला आत्मपरीक्षण करण्यास आणि उत्तर प्रदेशबाबत नवी रणनीती बनवण्यास भाग पाडले आहे. (RSS)

(हेही वाचा – Govt Scheme: शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त करणार; नेमकं काय करणार कार्य ? वाचा सविस्तर…)

भाजपासोबतच्या मतभेदांवरही होणार चर्चा? 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झारखंडची राजधानी रांची येथे १२ ते १४ जुलै दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) सर्वोच्च बैठक होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत आणि दत्तात्रेय होसबोले यांच्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच अलीकडे चर्चेत असलेल्या भाजपासोबतच्या मतभेदांवरही चर्चा होऊ शकते. झारखंडसह महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी होणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दिल्ली आणि शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या बैठकीत या निवडणुकांवरही चर्चा होऊ शकते. (RSS)

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. लोकसभेच्या ८० जागा आहेत. यामुळे या राज्यातील विजय कोणत्याही राजकीय पक्षाला केंद्रात सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतातील अनेक राजकीय-सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रमुख जातींचा उत्तर प्रदेशात एक चांगला मेळ आहे. संघ परिवाराने आपल्या प्रयत्नांतून समाजातील जातीय विविधता मागे टाकून सर्वांमध्ये एकता व समन्वय प्रस्थापित करण्यात यश मिळवले तर त्याचा संदेश देशाच्या इतर भागातही पोहोचेल, असे संघाला वाटते. आगामी काळातील निवडणुकीचा निकाल सुधारण्याच्यादृष्टीने संघाची ही बैठक खूप महत्त्वपूर्ण आहे. (RSS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.