अंबानींच्या संगीत सोहळ्यात Tejas Thackeray यांचा डान्स; भाजप म्हणते, कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत…

यावर भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी X वर पोस्ट करून मार्मिक शब्दांत टीका केली.

362

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आनंद अंबानी याच्या लग्न सोहळ्याची गेल्या कित्येक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्ताने विविध ठिकाणी शाही थाटात सोहळे आयोजित केले जात आहेत. असाच एक संगीत सोहळा काही दिवसांपूर्वी बी. के .सी इथल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे पार पडला. ज्यात उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी डान्स केला. त्यावर भाजपने मार्मिक टिपण्णी केली आहे.

या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाच्या या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडिओ, फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सोहळ्याला उद्धव ठाकरे हे देखील कुटुंबासह उपस्थित होते. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसंच तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

तेजस ठाकरे यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल

या संगीत सोहळ्यात सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, शिखर पहारिया तसेच वीर पहाडिया नाचताना दिसत आहेत. या डान्स व्हिडिओत तेजस ठाकरे या सगळ्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत. यात तेजस (Tejas Thackeray) तिसऱ्या रांगेत उभे राहून नाचत आहेत.

(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)

काय म्हणाले आशिष शेलार?

यावर भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी X वर पोस्ट करून मार्मिक शब्दांत टीका केली. यामध्ये आशीष शेलार म्हणाले,

जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा”  म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही..

ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत

जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही

“गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही..

तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींंच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला…!

हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून
महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले.

असो..
हे नृत्य पण कसे “जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता  त्या तरुणाचे “संजयकाका” महाराष्ट्राला पटवून देतीलच…!

तर सोशल मीडिया इंफ्लून्सर सुनैना होले यांनीही X वर पोस्ट टाकली असून त्यांनीही मार्मिक टिपण्णी केली.

सुनैना म्हणाल्या, महाराष्ट्रातील गुजरात्याच्या लग्नांत मराठी अस्मितेला शेवटच्या रांगेत स्थान.. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे.. मुंबई गुजरातला देण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. अदानी अंबानीच्या घश्यात मुंबई देण्यात येतेय..

हा मराठी माणसावर अन्याय आहे.. मराठी माणसाची गळचेपी होतेय.. मराठी माणसाला, मराठी अस्मितेला मागे ढकलण्यात येतंय ते ही मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबईत.. मराठी माणूस गुजरात्याच्या लग्नात नाचवला जातोय.. हा अपमान मी एक मराठी म्हणून कदापी सहन करणार नाही..

@OfficeofUT

@rautsanjay61
तुमच्या मराठी लेकावर झालेल्या अन्यायाचा बदला शेणके घेतीलच.. दिवसरात्र गुजरात आणि महाराष्ट्रातल्या गुजरात्यांना शिव्या देऊन.. तुम्ही मात्र त्यांच्या लग्नांत नाचत रहा..

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.