कल्याण येथील एका मेडिकल शॉपचा परवाना मंजूर करण्यासाठीएक लाख रुपयांची लाचेची मागणी करून खाजगी इसमामार्फत ७० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षकाला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. निरीक्षकासह २ जणांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी कल्याण येथे करण्यात आली आहे. (Bribe)
संदीप नरवणे आणि सुनील चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. संदीप नरवणे हे अन्न व औषध प्रशासन विभाग कल्याण येथे कार्यरत होते. कल्याण परिसरात तक्रारदार यांना नवीन मेडिकलचे शॉप सुरू करायचे असल्याने त्यांनी भाड्याने दुकान घेऊन मेडिकल शॉप परवानासाठी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. कल्याण विभागाचे औषध निरीक्षक संदीप नरवणे यांनी एका खाजगी व्यक्तीमार्फत तक्रारदाराला संपर्क साधून परवाना मंजुरीसाठी १ लाख रुपयांची मागणी केली. (Bribe)
(हेही वाचा – पतंजलीने १४ उत्पादनांची विक्री थांबवली, Supreme Courtने सांगितले…)
परंतु तक्रारदार या कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कल्याण येथे सापळा रचून लाचेची ७० हजार रक्कम स्वीकारताना एका खाजगी इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी औषध निरिक्षक नरवणे हे सरकारी वाहनात होते, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नरवणे आणि खाजगी इसम सुनील बाळू चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी कायदा अन्वये नरवणे आणि खाजगी इसम चौधरी याच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Bribe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community