वरळी हिट अँड रन (Worli Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी अखेर मंगळवार, ९ जुलै रोजी अटक केली. मिहिरला मुंबईतून अटक करण्यात आली. अपघातानंतर मिहिर फरार झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पण पोलिसांनी अखेर मिहिर शाह याला अटक केली. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. यात मिहिरची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे.
या 12 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह याला ताब्यात घेतले होते. पण न्यायालयाकडून त्यांना मंगळवारी जामीन मंजूर झाला. यानंतर आता पोलिसांनी मिहीर शाह याला अटक केली. मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून आरोपी मिहीर शाह याचा शोध घेत होते.
(हेही वाचा Rahul Gandhi : गांधी घराण्याच्या वंशजाची बालकबुद्धी!)
नेमके काय घडले होते?
मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक (Worli Hit And Run) दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेले होते. त्याने धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरपर्यंत महिलेला फरफटत नेले. यामुळे महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बोलला होता. यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन स्विट्च ऑफ केला आणि तो पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता.
Join Our WhatsApp Community