मुंबईतील सात उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंगळवारी (९ जुलै) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असून केंद्राच्या मान्यतेनंतर सात रेल्वे स्थानकांना नवे नाव मिळेल. (Assembly Session)
सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) दादाजी भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत मध्य रेल्वेवरील करीरोड स्थानकाचे नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी, पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नीरोडचे गिरगाव, कॉटनग्रीनचे काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे माझगांव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे करण्याचा ठराव मांडला. या ठरावावर चर्चा न होता तो एकमताने मंजूर करण्यात आला. (Assembly Session)
(हेही वाचा – Punjab Politics : शिरोमणी अकाली दलातील बंडखोरीमुळे दिल्लीतील शीख राजकारणात खळबळ)
दरम्यान, या ठरवाला पाठिंबा देताना काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधत ही मागणी सरकार मान्य करणार काय? असा सवाल केला. (Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community