Konkan Railway ची वाहतूक ठप्प; चार मेल-एक्स्प्रेस खोळंबल्या

215
महाराष्ट्रातील मडुरे ते गोव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आले आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील (Konkan Railway) अप आणि डाउन मार्गावरील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांवरील चिखल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी अतिवृष्टीमुळे यात अडचणी येत आहेत. दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने चार मेल-एक्स्प्रेस खोळंबल्या असून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकात नेण्याचे काम सुरू आहे. येत्या तासाभरात रेल्वे वाहतूक सुरु करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने दिली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा दरम्यान असलेल्या पेरनेम (पेडणे) बोगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल-पाणी रुळांवर आले आहे. यामुळे कोकण रेल्वेवरील (Konkan Railway) वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद आहे. रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने चार मेल-एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत. येत्या तासाभरात रेल्वे वाहतूक सुरु करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तिरुवअनंतपुरम एक्स्प्रेस ही ट्रेन थांबवण्यात आली आहे. या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी तब्बल नऊ तास त्याच ठिकाणी थांबले आहेत. या ठिकाणी तब्बल नऊ तास अडकून असल्याची माहिती आहे. प्रवाशांसाठी चहा आणि बिस्किट पुड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.