मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 10 जुलै रोजी पहाटे मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड (Nanded) या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. (Earthquake Marathwada) यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी (Parbhani) शहर, सेलू, गंगाखेड आदी भागांत भूकंपाचा हा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.
(हेही वाचा – Nagpur Accident : हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं! ४८ तासांत ६ जणांनी गमावले प्राण)
हिंगोली जिल्ह्यात जीवितहानी नाही
हिंगोली जिल्ह्यांमध्ये पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
वाशिममध्ये तीव्र झटके
मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात परिसरात घरावरील टीन पत्र्याचा मोठा आवाज झाला. गोठ्यात बांधलेली गुरेदेखील या भूकंपामुळे भयभीत झाल्याचे पहायला मिळाले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Earthquake Marathwada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community