Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?

285
Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?
Marathi Movie Producer : मराठी निर्मात्याची झाडावर चढून गळफास घेण्याची धमकी; काय घडले शिवाजी पार्कात?

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात एका झाडावर चढून चित्रपट निर्मात्याने (Marathi Movie Producer) आंदोलन सुरू केले होते. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून (AWBI) सुरू असलेल्या जाचक वसुलींच्या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले. प्रविणकुमार मोहरे (Pravin Kumar Mohre) असे या निर्मात्याचे नाव आहे. आपली सुटका करण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास गळफास घेऊ अशी धमकी त्यांनी घटनास्थळी असलेल्या पोलीस, अग्निशमक दलाच्या जवानांना दिली आहे. छत्रपती शिवाजी पार्कमध्ये अचानकपणे हे आंदोलन सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. (Marathi Movie Producer)

(हेही वाचा –Up Accident: उत्तर प्रदेशात भीषण अपघात! दुधाच्या कंटेनरला बसची धडक, १८ प्रवाशांचा मृत्यू)

निर्माते दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे हे ज्या झाडावर चढले होते, त्या झाडावर त्यांनी आपल्या मागण्यांचा बॅनरही झळकवला होता. प्रविणकुमार यांनी हे आंदोलन अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडून वसूल करण्यात येत असलेल्या शुल्काविरोधात सुरू केले आहे. आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी निर्मात्याचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रविणकुमार यांना झाडावरून उतरण्याची विनंती केली. पण, त्यांनी विनंती अमान्य केली. या उलट मला झाडावरून उतरवण्याचा प्रयत्न केल्यास आपण गळफास घेऊन आत्महत्या करू अशी धमकी देखील त्यांनी दिली. (Marathi Movie Producer)

प्रविणकुमार यांनी म्हटले की, चित्रपटात प्राण्यांचा वापर करायचा असल्यास AWBI ला 30 हजार रुपये द्यावे लागतात. त्यानंतर आम्हाला AWBI कडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळते. जर, आम्ही हे शुल्क भरले नाही तर ते दृष्य चित्रपटातून वगळावे लागते. याचा अर्थ 30 हजार रुपये भरले तर शूटिंग दरम्यान प्राण्यांसोबत होणारा कथित अन्याय थांबणार का? असा सवालही त्यांनी केला. (Marathi Movie Producer)

(हेही वाचा –Doda Terrorist Attack: डोडामधील अतिरेकी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधात चार शोधपथके, हेलिकॉप्टर, ड्रोन शोधमोहिमेवर)

आमचा चित्रपट रिलीजच्या वाटेवर आहे. चित्रपटात पाळीव प्राण्यावर दृष्ये चित्रीत करण्यात आले आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नसल्याने आता हा चित्रपट रिलीज कसा करायचा? असा सवाल प्रविणकुमार यांनी केला. जनावरांच्या बेकायदेशीपणे कत्तली रोखण्याऐवजी AWBI कडून प्राण्यांवरील कथित छळ रोखण्याऐवजी निर्मात्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोपही प्रविण कुमार मोहारे यांनी केला. (Marathi Movie Producer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.