हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी: Ramdas Athawale

163
हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी: Ramdas Athawale
हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी: Ramdas Athawale

उत्तरप्रदेशातील हाथरस (Hathras ) जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमात जमलेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 121 निष्पाप जणांचा बळी गेला.ही दुर्घटना अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला राज्य सरकारने सांत्वनपर मदत जाहिर केली आहे.मात्र त्या सोबत संबंधीत कार्यक्रमाचे आयोजक नारायण साकार हरि या बाबाच्या संपत्तीतुन हाथरस दुर्घटनेतील परिवाराला आणि जखमींना सांत्वंनपर आर्थिक मदत करावी.तसेच दुर्घटनेतील मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीला उत्तर प्रदेश राज्य सरकारने नोकरी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्याकडे केली आहे.

(हेही वाचा –Heavy Rainfall: उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार; मुसळधार पावसाने १० जणांचा बळी!)

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील हाथरस मधील नवीपुर येथे हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराची भेट घेतली.यावेळी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.पुन्हा अशी दुर्घटना घडता कामा नये अशी खबरदारी राज्य सरकारने घ्यावी याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale)

(हेही वाचा –Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बोगद्यात पाणी आल्याने ‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला तर, ‘या’ ९ ट्रेन रद्द)

पोलिस प्रशासनाने याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून चौकशी चालू आहे.या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. पिडित परिवाराच्या पाठिशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहील असे रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष पवन गुप्ता,उपाध्यक्ष विनोद कुमार,किशोर मासुम,सचिव हरि ओम आदि यावेळी उपस्थित होते. (Ramdas Athawale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.