Worli hit and run: राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी!

267
Worli hit and run: राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी!
Worli hit and run: राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी!

वरळी हिट अँड रन प्रकरणातील (Worli hit and run) आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास राजेश शहांच्या (Rajesh Shah) मुलानं बीएमडब्ल्यू कारने वरळीत दाम्पत्याला उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती थोडक्यात बचावला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा रविवारपासूनच फरार होता. त्याला मंगळवारी विरारमधून अटक करण्यात आली. यानंतर बुधवारी राजेश शहांची शिंदेसेनेतून हकालपट्टी केली आहे. (Worli hit and run)

हकालपट्टीचा आदेश

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने राजेश शहांच्या हकालपट्टीचा आदेश काढला आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या आदेशावरुन राजेश शहांना शिवसेना उपनेतेपदावरुन कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हिट अँड रनच्या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राजेश शहांना या प्रकरणात अटक झालेली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयानं जामीन दिला. (Worli hit and run)

नेमकं काय घडलं?

रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळीतील ऍट्रिया मॉलजवळ मिहीर शहाच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर नाखवा दाम्पत्य प्रवास करत होतं. ते ससून डॉकवरुन घरी परतत होते. कारची धडक बसताच नाखवा दाम्पत्य बोनेटवर पडलं. प्रदिप नाखवांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यांनी कारसोबत धाव घेत चालकाकडे गयावया केली. कार थांबवण्यासाठी आर्जवं केली. पण मिहीर शहानं कार दामटवली. त्यामुळे प्रदिप यांच्या पत्नी कावेरी गंभीर जखमी झाल्या. कावेरी यांना मिहीरने २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर मिहीरने कार थांबवली. त्याने कारमधून बाहेर पडत त्याचा चालक राजऋषीच्या मदतीनं बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरींना बाहेर पाडलं. त्यानंतर राजऋषी कारच्या ड्रायव्हर सीटवर बसला. त्यानं कार कावेरी यांच्या अंगावरुन नेली. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर आरोपी आणि ड्रायव्हर फरार झाले होते. (Worli hit and run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.