मराठी लघुकथांना साहित्याच्या जगात स्थान मिळवून देणारे अफलातून लेखक G.A. Kulkarni

143
मराठी लघुकथांना साहित्याच्या जगात स्थान मिळवून देणारे अफलातून लेखक G.A. Kulkarni
मराठी लघुकथांना साहित्याच्या जगात स्थान मिळवून देणारे अफलातून लेखक G.A. Kulkarni
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी हे एक भारतीय मराठी लघुकथा लेखक होते. त्यांना जी.ए. (G.A. Kulkarni) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै १९२३ साली झाला. बेळगाव येथे त्यांचं बालपण गेलं. त्यांनी आपलं पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी धारवाड इथल्या JSS कॉलेजमध्ये तीस वर्षे इंग्रजी विषय शिकवला. त्यांना बेळगाव आणि धारवाड येथेच रहायला आवडायचं. कारण त्यांनी या दोन ठिकाणी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं.
पण १९८५ साली त्यांना त्यांच्या नेत्रविकारांच्या उपचारांसाठी नाईलाजाने पुण्याला जाऊन रहावे लागले. ते पुण्याच्या कोथरूड भागात रहायचे. आपल्या आयुष्याची शेवटची दोन वर्षे ते पुण्यात राहिले होते. जी.ए. कुलकर्णी या ठिकाणी रहायचे, त्या ठिकाणच्या मोठ्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
मराठी लघुकथांना त्यांनी साहित्याच्या जगात एक वेगळेच स्थान मिळवून दिले होते. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर हे त्यांचे समकालीन लेखक होते. जी.ए. कुलकर्णींचा स्वतःचा असा एक वेगळा वाचकवर्ग होता. त्यांनी आपल्या लेखनात वाचकांना हवी असलेली अभिरुची कायम ठेवली होती.
जी.ए. कुलकर्णी यांनी आपल्या लघुकथांमध्ये स्वतःचं असं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. त्यांची पात्रं न सापडणाऱ्या ध्येयाच्या, त्यांना न कळणाऱ्या त्यांच्या प्राक्तनाच्या शोधात आहेत. त्यांच्या कथांमध्ये एक गडद वळण एक अस्पष्ट मार्ग दाखवत असतं आणि नियती त्यांच्या पात्रांना मार्ग दाखवून आपल्या मायेची सावली देते. कुलकर्णी आपल्या कथांमध्ये प्रतिकात्मकता, रूपकात्मकता आणि विडंबन यांचा वापर करायचे. त्यामुळे त्यांच्या कथांना एक वेगळाच पोत मिळायचा आणि कथा वाचताना वाचकांच्या भावना उचंबळून यायच्या.
त्यांच्या कथाविश्वामध्ये स्थानिक परिस्थिती आणि अनुभवांची विविधता विस्तृतपणे मांडलेली असायची. त्यांचं (G.A. Kulkarni) मानवी, प्राणी आणि सामाजिक जगाचे सौंदर्य आणि विकृती यातील त्याच्या सूक्ष्म निरीक्षण खूप चांगलं होतं. त्यामुळे वाचकाला कथेतली पात्रं, ठिकाणं आणि अनुभव ओळखणे शक्य व्हायचं.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.