Wimbledon 2024 : यानिक सिन्नरला पराभवाचा धक्का, मेदवेदेव उपांत्य फेरीत

Wimbledon 2024 : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सिन्नरला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागलाय.

130
Wimbledon 2024 : यानिक सिन्नरला पराभवाचा धक्का, मेदवेदेव उपांत्य फेरीत
  • ऋजुता लुकतुके

विम्बल्डनची पुरुषांमधला यंदाचा सगळ्यात रंगतदार सामना पाचवा मानांकित डॅनिएल मेदवेदेव आणि अव्वल मानांकित यानिक सिन्नर यांच्यात पार पडला. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना जिंकला मात्र मेदवेदेवने. सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी चांगले फटके मारले आणि चुकाही एकसारख्याच केल्या. पण, त्यामुळे शेवटपर्यंत नेमकं कोण जिंकेल हे त्या दोघांनाही कळत नसेल कदाचित. (Wimbledon 2024)

अखेर हा सामना मेदवेदेवने ६-७, ६-४, ७-६, २-६ आणि ६-३ असा जिंकला. सामन्यात पावसानेही तीनदा व्यत्यय आणला, हिरवळीचं कोर्ट हे मेदवेदेवचं लाडकं मैदान आहे. आणि इथं सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. याचवर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दोघे खेळाडू अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. पहिले दोन सेट जिंकूनही मेदवेदेवने ही ग्रँडस्लॅम गमावली होती. त्या पराभवाचा वचपा मेदवेदेवने विम्बल्डनमध्ये काढला. (Wimbledon 2024)

(हेही वाचा – Animal Licence : विदेशी प्राणी पाळण्याचा छंद आहे ? वाचा काय आहेत नवे नियम…)

सिनरला या सामन्यात थोडाफार दुखापतीचाही त्रास झाला. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला त्याने ब्रेकही घेतला. हा सेट त्याने टायब्रेकवर गमावला. पण, चौथ्या सेटमध्ये त्याने सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि हा सेट ६-२ ने जिंकत त्याने सामनाही पाचव्या सेटपर्यंत खेचला. सामन्यात २-२ अशी बरोबरी असताना पाचव्या सेटची सुरुवात मात्र मेदवेदेवच्या बाजूने झाली. आणि सुरुवातीलाच मेदवेदेवने सिनरची सर्व्हिस ब्रेक करून ही आघाडी शेवटपर्यंत राखली. (Wimbledon 2024)

मेदवेदेवचा उपांत्य फेरीत मुकाबला आता कार्लोस अल्काराझशी होणार आहे. अल्काराझने टॉमी पॉलचा ५-७, ६-४, ६-२ आणि ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. (Wimbledon 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.