दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत ग्वाही

115
दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत ग्वाही

राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर असून दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत दिली. (DCM Ajit Pawar)

दूध भेसळी संदर्भात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहितीही सभागृहाला दिली. पवार म्हणाले की, दूधभेसळीच्या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन यापूर्वी राज्य सरकारने दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा केला होता. हा कायदा राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठीही पाठविण्यात आला आहे. मात्र, दूधभेसळीच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देणे ही शिक्षा तुलनेने फार मोठी असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाचे मत असावे, त्यामुळे त्यावर अद्याप राष्ट्रपतींची सही झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या Dearness Allowance मध्ये 4 टक्क्यांची वाढ; ‘या’ तारखेपासून लागू होणार निर्णय)

दूध भेसळीवर घेणार अत्यंत कडक भूमिका

दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना निर्भेळ-भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. याबाबत शासनही गंभीर असून त्यासंदर्भात आपल्याच अध्यक्षतेखाली, संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक घेतली जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी विभागाला आवश्यक असणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही दुरुस्त करण्यात येतील, अशीही ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात दिली. (DCM Ajit Pawar)

सध्याच्या परिस्थितीत दूध उत्पादकांच्या दुधाला बऱ्यापैकी दर मिळू लागले आहेत. अशावेळी झोपडपट्टी भागामध्ये किंवा इतर अज्ञात ठिकाणी काही व्यक्तींकडून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही जास्त दर असणाऱ्या ब्रॅन्डच्या दूध पिशव्यांमध्ये पाणी मिसळणे, इंजेक्शनने भेसळीसारखे गैरप्रकार केले जातात. अशा भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या गोष्टी अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात अत्यंत कडक भूमिका घेण्याचीही राज्य सरकारची तयारी आहे. याही अनुषंगाने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी माहितीही पवार यांनी सभागृहात दिली. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.