Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटमधील ‘मि. इन्टेन्स’ समोरची नवीन आव्हानं, भारतीय क्रिकेटचा स्थित्यंतराचा काळ

Gautam Gambhir : शांत धीरोदात्त राहुल द्रविडच्या तुलनेत गौतम गंभीरचं व्यक्तिमत्त्व अगदीच विरुद्ध आहे.

119
Gautam Gambhir : भारतीय क्रिकेटमधील ‘मि. इन्टेन्स’ समोरची नवीन आव्हानं, भारतीय क्रिकेटचा स्थित्यंतराचा काळ
  • ऋजुता लुकतुके

माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरच्या क्रिकेट कारकीर्दीत नवीन पर्व आता सुरू होत आहे. भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रशिक्षकाची धुरा बुधवारपासून त्याने हातात घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूवर घरा-घरांत आणि मीडियामध्येही काटेकोरपणे लक्ष असतं. प्रत्येक विजय आणि पराभव इथं रोलरकोस्टर राईडसारखा असतो. गौतम गंभीर अशावेळी संघाची धुरा हातात घेतोय जेव्हा आधीच्या राहुल द्रविडने संघाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. शिवाय दोघांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. (Gautam Gambhir)

राहुल आणि गंभीर एकत्र खेळलेले आहेत. दोघांपैकी राहुल धीरोदात्त, गंभीर. तर गौतम गंभीर हा सडेतोड आणि मनात येईल ते बोलणारा, आपल्याला हवं ते करून घेणारा. गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर काम करताना आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंना गंभीरने संधी दिली आणि पुढे आणलं. प्रशिक्षक म्हणून तीच त्याची ओळख आहे, गाठीला २०१२ आणि २०१४ मधील आयपीएल विजेतेपदं आहेत. (Gautam Gambhir)

पण, आता आव्हान आहे ते भारतीय संघातील स्टार खेळाडूंबरोबर काम करण्याचं. खासकरून भारतीय संघातील स्टार खेळाडूंबरोबर गौतम गंभीरचं नातं कसं तयार होतं यावर आता सगळ्यांची नजर असेल. भारतीय संघाची ड्रेसिंग रुम गंभीरसाठी नवीन नाही. पण, प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ खेळाडूंचे इगो सांभाळत त्यांच्याकडून कामगिरीची अपेक्षा ठेवायची ही कसरत गंभीरला करावी लागणार आहे. म्हणजेच रणनीतीबरोबर थोडीशी मुत्सद्देगिरीही गंभीरला स्वभावात आणावी लागणार आहे. (Gautam Gambhir)

(हेही वाचा – Gautam Gambhir : अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांच्या नावाची घोषणा)

गंभीरने स्वत:च यापूर्वी अनेकदा तीन वेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे संघ खेळवण्यावर भाष्य केलं आहे. आता तीन वेगवेगळ्या प्रकारात तो काय वेगळी रणनीती आखतो यावर सगळ्यांची नजर असेल. त्याने फलंदाज म्हणून नेपिअर, दरबन आणि वेलिंग्टन इथं शतकं झळकावली आहेत. आता कसोटीत भारतीय संघाला अजिंक्यपदापर्यत न्यायचं असेल तर परदेशात जिंकणं अनिवार्य आहे. (Gautam Gambhir)

संघात चांगलं वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने खेळाडूंबरोबर जुळवून घेणं हे गंभीरचं पहिलं काम असणारए. खासकरून रोहित शर्मा आणि विराट कोहलीबरोबर तो कसं जुळवून घेतो यावर बरंच काही अवलंबून आहे. रोहित शर्माबरोबर त्याची चांगली मैत्री आहे. रोहितच कसोटी तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीशी मात्र गंभीरने यापूर्वी अनेकदा वाद ओढवून घेतला आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक होणं हे आव्हानात्मक काम आहे. गौतम गंभीरला आव्हानं पेलण्याची सवय असली तरी हे आव्हान वेगळं आहे. (Gautam Gambhir)

गौतम गंभीरचे स्वभाव विशेष
  • २००३ ते २०१६ भारतीय संघात सलामीवीर म्हणून स्थान
  • विरेंद्र सेहवागबरोबर डावी-उजवी जोडी गाजलेली
  • सडेतोड बोलणं आणि मैदानांवरील भांडणांचा इतिहास
  • ५४ कसोटींत ४,१५४ धावा आणि १४७ एकदिवसीय सामन्यांत ५,२४७ धावा
  • २००९ मध्ये आयसीसी कसोटी खेळाडूचा पुरस्कार
  • त्याच्या कप्तानीखाली भारताने खेळलेल्या ६ एकदिवसीय सामन्यांत यशाची टक्केवारी १०० %
  • २००७ चा टी-२० विश्वचषक विजय आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक विजय यात अंतिम सामन्यांत निर्णायक कामगिरी
  • कोलकाता नाईट रायडर्सला २०१२, २०१४ मध्ये आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा
  • २०१९-२०२४ कालात पूर्व दिल्लीतून भाजपा खासदार

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.