Saras Baug : सारसबागेत धार्मिक अतिक्रमण; नमाज पठण करणाऱ्यांना संरक्षण; शिववंदना म्हणणाऱ्यांची गळचेपी

शुक्रवार, ११ जुलै रोजी सारसबागेत शिववंदना होणारच असे आयोजक संग्राम (अक्षय) ढोले पाटील म्हणाले.

880
पुण्यात सध्या पोलिसांचा पक्षपातीपणा सुरु आहे की काय, असे चित्र पाहायला मिळत आहे. येथील प्रसिद्ध सारसबाग (Saras Baug) येथे मुसलमान नमाज पठणासाठी गर्दी करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांकडून धार्मिक अतिक्रमण होत आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी मागील शुक्रवारी, ५ जुलै रोजी बागेतीलच श्री गणेश मंदिरात शिववंदना सामूहिकपणे म्हटली. त्यामुळे आयोजक संग्राम (अक्षय) ढोले पाटील यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ११ जुलै रोजी शुक्रवारी पुन्हा शिववंदनेचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र पोलिसांनी ढोले-पाटील यांना याच दिवशी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. तसेच शिववंदनेसारखा कार्यक्रम पुन्हा आयोजित होणार नाही अशा स्वरूपाच्या अटीशर्थी या नोटिशीत घालण्यात आल्या आहेत.

काय आहे स्थानिक हिंदूंत्वनिष्ठांचा आक्षेप? 

पुण्यातील सारसबाग (Saras Baug) ही सर्वात जुनी बाग असून ती पुणे महापालिकेच्या मालकीची आहे. ही बाग पुण्यातील पर्यटनस्थळांपैकी एक असल्याने इथे पर्यटकांची जशी गर्दी असते, तशीच स्थानिक पुणेकरही दररोज या बागेत गर्दी करत असतात. पण मागील ३-४ वर्षांपासून या बागेत मुसलमान नमाज पठाणासाठी येऊ लागले आहेत. आता तर या बागेत (Saras Baug) नमाज पठणासाठी येणाऱ्या मुसलमानांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आता या बागेत येणाऱ्यांची विशेषतः हिंदूंची संख्या कमी होऊ लागली आहे. या बागेत हिंदू मुली आणि तरुणींना असुरक्षित वाटू लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी मुसलमान नमाज पठणासाठी का येत आहेत? महापालिका आणि पोलीस प्रसाशन कारवाई का करत नाही? असे हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे.

सारसबागेत शिववंदना म्हणत प्रतित्युत्तर 

हा प्रकार महापालिका आणि पोलीस प्रशासन थांबवत नाही, म्हणून स्थानिक हिंदूंनी प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सारसबागेतील (Saras Baug) श्री गणेश मंदिरात शुक्रवार, ५ जुलै रोजी शिववंदना आयोजित केली होती. २००-२५० हिंदूंनी यावेळी एकत्र येऊन शिववंदना म्हटली. मात्र त्यानंतर पोलिसांनी शिववंदनेचे आयोजन करणारे संग्राम (अक्षय) ढोले पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर ढोले-पाटील यांनी ११ जुलै रोजी शुक्रवारी पुन्हा शिववंदनेचे आयोजन केले. हे समजताच पोलिसांनी ढोले-पाटील यांना ९ जुलै रोजी नोटीस पाठवून त्यांना शुक्रवार, ११ जुलै रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले, तसेच पुन्हा शिववंदनासारखा कार्यक्रम आयोजित करणार नाही अशा स्वरूपाच्या अटीशर्थी टाकल्या, त्यामुळे हिंदूंच्या मनात आता त्यांची गळचेपी केली जात आहे का, अशी भावना निर्माण होऊ लागली आहे. मात्र असे असले तरी शुक्रवार, ११ जुलै रोजी सारसबागेत शिववंदना होणारच असे संग्राम (अक्षय) ढोले पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.