केजरीवालांचा AAP पक्ष अडचणीत; EDने दारू घोटाळ्यातील आरोपपत्रात घेतले नाव

ईडीने या २३२ पानी आरोपपत्रात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारू व्यावसायिकांशी संगनमत करून आपल्या बाजूने धोरण वळवून आपच्या सर्वोच्च पक्षनेत्याला फायदा मिळवायचा होता, असे यात म्हटले आहे.

265
दिल्लीतील दारू घोटाळ्यात गजाआड असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांचा मुक्काम आणखी किती दिवस असणार यावर आम आदमी पक्ष चिंतेत असताना पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. ED ने या घोटाळ्यातील आरोपपत्रात AAP लाही सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे पक्षाची मान्यताच रद्द होणार का, अशी भीती पक्षाला वाटू लागली आहे.
ईडीने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात केजरीवाल यांना आरोपी क्रमांक ३७ आणि AAP ला ३८ व्या क्रमांकाचा आरोपी बनवले आहे. एखाद्या घोटाळ्यात एखाद्या राजकीय पक्षालाच आरोपी बनवणे ही तुरळक घटना मनाली जात आहे. कारण जर आरोप सिद्ध झाला तर पक्षाची मान्यता रद्द होणार आहे. केजरीवाल हे AAP चे राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.

१०० कोटींची लाच मिळालेली 

ईडीने या २३२ पानी आरोपपत्रात मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारू व्यावसायिकांशी संगनमत करून आपल्या बाजूने धोरण वळवून आपच्या सर्वोच्च पक्षनेत्याला फायदा मिळवायचा होता, असे यात म्हटले आहे. दारू घोटाळ्यातून आप ला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या लाचेपैकी ४५ कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हवालाद्वारे पाठवण्यात आले होते. गोव्याच्या निवडणुकीत किती पैसा वापरला गेला याची केजरीवाल यांना पूर्ण कल्पना होती आणि ते स्वतः त्यात गुंतले होते असा आरोप करताना ईडीने केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्या व्हॉट्सॲप चॅटचा तपशील न्यायालयात सादर केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.