पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात लोकल ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या (Mumbai Crime) करणाऱ्या हरिश मेहता आणि जय मेहता या पितापुत्रांची सध्या चांगलीच चर्चा आहे. हरिश मेहता (Harish Mehta) आणि जय मेहता या बापलेकाच्या आत्महत्येवेळचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनाला वेदना झाल्या होत्या.
(हेही वाचा –Pune News : पुण्यावर रात्रीच्या वेळी ड्रोनची नजर, नेमकं काय आहे प्रकरण?)
दोघेही बापलेक एकमेकांचा हात पकडून मृत्यूला सामोरे गेले होते. या दोघांनी रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवलं, त्यामुळे ट्रेन (Mumbai Local Train) यांच्या डोक्यावरुन जाऊन त्याचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरिश आणि जय मेहता (Jay Mehta) यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याची चर्चा सुरु झाली होती. या दोघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. (Mumbai Crime)
हरिश मेहता आणि जय मेहता हे दोघे वसईतील वसंतनगरी परिसरात राहत होते. मंगळवारी त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी हरिश आणि जय मेहता यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना घरात इंग्रजी भाषेत लिहलेली एक चिठ्ठी सापडली. ‘या चिठ्ठीत या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत’, असे लिहलेले आहे. त्यामुळे मेहता पितापुत्रांनी आत्महत्या केली की काही वेगळाच प्रकार आहे, या शक्यतेने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून सध्या मेहता बापलेकाच्या बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि मोबाईल रेकॉर्ड तपासले जात आहेत. (Mumbai Crime)
(हेही वाचा –Worli Hit and Run Case: मिहीर आणि राजऋषीच्या माहितीत तफावत; पोलिसांनी सांगितले मिहीर शहाचे कारनामे!)
सुरुवातीला मेहता पितापुत्रांना शेअर बाजारात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने ते कर्जबाजारी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी नव्याने केलेल्या तपासात हरिश मेहता आणि जय मेहता यांनी कोणतेही कर्ज घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. मग मेहता पितापुत्रांनी नेमक्या कोणत्या दबावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community