- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावाची घोषणा आता झाली. सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याचे सहाय्यक म्हणून कोणाची निवड होते याची. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सध्या झहीर खान (Zaheer Khan) आणि लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. बीसीसीआयकडून या दोघांना मुलाखतीसाठी बोलावणं येऊ शकतं. (India’s Bowling Coach)
(हेही वाचा- Andheri Flyover : पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी उड्डाणपूल अधांतरीच, नक्की पूल कुणाच्या ताब्यात?)
‘विनय कुमारचं (Vinay Kumar) नावही चर्चेत होतं. पण, बीसीसीआयमधील (BCCI) पदाधिकाऱ्यांना ते फारसं रुचलेलं नाही. तिथे चर्चा सुरू आहे ती झहीर आणि बालाजीची. या दोघांशी बीसीसीआयची चर्चाही सुरू असल्याचं समजतंय,’ असं सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. झहीर (Zaheer Khan) भारतासाठी ९२ कसोटी सामने खेळला आहे. आणि यात त्याने ३१६ बळी मिळवले आहेत. तर कसोटी आणि एकदिवसीय सामने मिळून ६०० च्या वर बळी त्याच्या नावावर जमा आहेत. (India’s Bowling Coach)
Many thanks for your extremely kind words and constant support @JayShah bhai. Elated to be a part of this journey! The entire team together will strive for excellence and newer heights. https://t.co/BgAbTwN59u
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 9, 2024
दुसरीकडे, लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji) भारताकडून ८ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने २७ बळी मिळवले आहेत. तर त्याच्या नावावर ३० एकदिवसीय बळीही जमा आहेत. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड झाल्यानंतर त्याच्याशी सल्ला मसलत करून त्याचा सहाय्यक प्रशिक्षक वर्ग निवडला जाईल. (India’s Bowling Coach)
(हेही वाचा- Ind vs Zim, T20 : झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव करत भारतीय संघाची मालिकेत २-१ ने आघाडी)
गौतम गंभीर (Gautam Gambhir) २००७ चं टी-२० विजेतेपद आणि २०११ च्या एकदिवसीय विजेतेपदाचा साक्षीदार आहे. शिवाय त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलही जिंकली आहे. तर यंदा तो कोलकाता संघाचा मार्गदर्शक होता. आंद्रे रसेल (Andre Russell), सुनील नारायण (Sunil Narine) यांच्या संघातील उत्कर्षासाठी तो जबाबदार मानला जातो. कोलकाता संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला (Abhishek Nair) गंभीर फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून निवडेल अशी दाट शक्यता आहे. (India’s Bowling Coach)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community