- ऋजुता लुकतुके
बॅडमिंटनमधील भारताचे पहिले चॅम्पियन खेळाडू प्रकाश पदुकोण पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक असणार आहेत. १९८० साली मानाची ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकून पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटनचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं होतं. ते १९९१ मध्ये निवृत्त झाले. आणि ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा समावेश पहिल्यांदा झाला तो १९९२ मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये. त्यामुळ पदुकोण आपल्या कारकीर्दीत ऑलिम्पिक कधी खेळू शकले नाहीत. पण, आता भारतीय खेळाडूंना ते मार्गदर्शन करणार आहेत. (Paris Olympic 2024)
एकेरीतील भारताचा एक प्रमुख खेळाडू लक्ष्य सेन हा प्रकाश पदुकोण यांच्या हाताखाली तयार झाला आहे. तर पी व्ही सिंधूही अलीकडे बंगळुरूमध्येच सराव करते. पॅरिस ऑलिम्पिकसाठीच हा बदल केल्याचं सिंधूने उघडपणे बोलून दाखवलं होतं. भारताच्या बॅडमिंटन चमूत ७ खेळाडू आणि ६ जणांचा सपोर्ट स्टाफ आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – Up bus accident : ट्रेनची तिकीट मिळाली नाही म्हणुन बस पकडली आणि… मोतिहारीचे संपूर्ण कुटुंब ठार)
‘पुलेला गोपीचंद, गुरु साईदत्त, मथियास बो, विमल कुमार आणि एगस सांतोसा हे प्रशिक्षकही भारतीय संघाबरोबर असतील. तर प्रकाश पदुकोण संघाचे मार्गदर्शक असतील,’ सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. पुलेला गोपीचंद सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तर गुरू साईदत्त एच एस प्रणॉयचा प्रशिक्षक आहे. लक्ष्य सेन विमल कुमार यांच्याबरोबर तर दुहेरीच्या दोन जोड्या मथियास बो यांच्याबरोबर सराव करतात. सिंधू बंगळुरू इथं एगस यांच्याबरोबर सराव करते. (Paris Olympic 2024)
किरण व झिनिया हे दोन फीजिओही भारतीय संघाबरोबर असतील. झिनिया ही सिंधूबरोबर काम करते. सिंधू पॅरिसमध्ये सलग तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी प्रयत्नशील असेल. २०१२ मध्ये सायना नेहवालने मिळवलेल्या ऑलिम्पिक कांस्य पदकानंतर भारताने त्यानंतर झालेल्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community