- ऋजुता लुकतुके
अर्थसंकल्पाविषयी चर्चा सुरू असेल तर पगारदार आणि मध्यमवर्गीय व्यक्तींचं लक्ष असतं ते आयकरात सवलत मिळवून देणाऱ्या गुंतवणुकींवर आणि करपात्र उत्पन्न कसं कमी होईल यावर. चालू पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा पूर्ण लंबीचा अर्थसंकल्प सादर करतील. कारण, मार्चमध्ये सादर केलेला संकल्प हे लेखानुदान होतं. नवीन अर्थसंकल्पात करांच्या दरात कुठलेही बदल अपेक्षित नसले तरी करपात्र उत्पन्नाची मर्यादा मात्र ३ लाख रुपयांवरून ५ लाखांवर येऊ शकते. (Income Tax Limit)
अर्थात, ही सूट नवीन कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना मिळेल असा अंदाज आहे. या बदलाची आर्थिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आणि तसं झाल्यास सव्वासात लाख ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांचं कर दायित्व १०,४०० रुपयांनी कमी होईल. तर ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांचे करापोटी ११,४४० रुपये वाचतील. (Income Tax Limit)
(हेही वाचा – Up bus accident : ट्रेनची तिकीट मिळाली नाही म्हणुन बस पकडली आणि… मोतिहारीचे संपूर्ण कुटुंब ठार)
याशिवाय जुन्या कर प्रणालीत सर्वाधिक उत्पन्न गटातील लोकांना बसणारा ३० टक्के कर कमी करून २५ टक्क्यांवर आणावा अशीही जाणकारांची विनंती आहे. पण, ती मान्य होण्याची शक्यता कमी आहे. अलीकडे महागाई दरातील वाढीमुळे रिझर्व्ह बँकेनं मागची अडीच वर्षं व्याजदर कमी करण्याचं धोरण ठेवलं आहे. अशावेळी लोकांच्या हातात खर्चासाठी कमी पैसे राहत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना आयकराच्या रुपाने दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. आणि या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करू शकतं. जुन्या कर प्रणालीत कुठलाही बदल संभवत नाही. प्रमाणित वजावट मात्र ५०,००० हजार रुपयांवरुन वाढून किमान ७५,००० रुपयांवर जाऊ शकते. पण, दरांत बदल होण्याची शक्यता कमीच आहे. (Income Tax Limit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community